घरCORONA UPDATECorona Update : मुंबईत २४ तासांत १,१०५ नवे रूग्ण; तर ४९ मृत्यू!

Corona Update : मुंबईत २४ तासांत १,१०५ नवे रूग्ण; तर ४९ मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १६ हजार ४५१ वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ६ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ३९३ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत ८८ हजार २९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

आज मुंबईत ८०९ संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भरती होण्याची संख्या ८२ हजार ४४५ वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत २१ हजारून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ रुग्ण पुरुष आणि १८ रुग्ण महिला होत्या. तसेच ३७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३१ जणांचे वय ४० वर्षावरील होते तर उर्वरीत मृत्यू हे ४० ते ६० दरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे. ३१ जुलैपर्यंत मुंबईत ५ लाख ४६ हजार ६२० कोविड-१९च्या चाचण्या झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे.


हे ही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासात ९,५०९ नवे रूग्ण, तर २६० मृत्यू!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -