शिवाजी पार्कमध्ये गोड्या पाण्याचे ५ स्त्रोत, ३५ विहीरिंचे खोदकाम

पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पालिकेच्या मार्फत २.९० कोटी रुपये खर्च असलेल्या शिवाजी पार्कच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

5 freshwater sources in Shivaji Park Excavation of 35 wells
शिवाजी पार्कमध्ये गोड्या पाण्याचे ५ स्त्रोत, ३५ विहीरिंचे खोदकाम

महाराष्ट्रातील समुद्रातील बेटावर उभारण्यात आलेल्या मुरुड जंजिराया अभेद्य किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ला समुद्रात असूनही किल्ल्यात मात्र गोड पाणी आहे. असेच काहीसे वैशिष्ट्य आता दादर शिवाजी पार्कचे झाले आहे. शिवाजी पार्क समुद्रापासून ३०० मिटर अंतरावर असून त्याचे नूतनीकरण काम सुरू असताना येथे अवघ्या ७ फुटांवर गोड्या पाण्याचे ५ स्रोत आढळून आले आहेत. पालिकेने दादर येथील २४ एकर जागेत असलेल्या शिवाजी पार्कचे नूतनीकरण करताना मुबलक पाण्यासाठी या ठिकाणी ३५ रिंगवेलचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कला आता पाण्याची कमतरता भासणार नाही. (5 freshwater sources in Shivaji Park Excavation of 35 wells)

पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पालिकेच्या मार्फत २.९० कोटी रुपये खर्च असलेल्या शिवाजी पार्कच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र नुतनीकरणाच्या कामापूर्वी शिवाजी पार्कचे भुगर्भ तज्ज्ञांकडून परिक्षण करण्यात आले त्यात गोड्या पाण्याचे ५ स्त्रोत आढळून आले आहेत. त्यामुळेच आता या ठिकाणी ३५ रिंगवेलचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील प्रत्येक विहीरीमधून किमान २५ हजार लिटर पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


हेही वाचा – ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाच्या जागी ५ महिन्यात नवीन पुलाची निर्मिती