मातेच्या डायबिटीजमुळे जन्मले ५ किलोचे बाळ

महिलांमध्ये नसणाऱ्या‌ जनजागृतीमुळे गर्भवती महिला डायबिटिजकडे दुर्लक्ष करतात. पण, त्याचा परिणाम गर्भातील बाळावर ही होतो.

Amit Deshmukh says Pay special attention to child and mother mortality
बाल - माता मृत्यू प्रमाणावर विशेष लक्ष द्या

मुंबईतील कामा हॉस्पिटलसमध्ये एका २८ वर्षीय महिलेने ५ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. या महिलेला गर्भारपणात अचानक तीव्र डायबिटीजचं निदान झालं. ही डायबिटीज असेलली महिला प्रसूतीसाठी २६ एप्रिलला कामा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर तिला तीव्र डायबिटीज असल्याचं निदान झालं.

महिलांनी गरोदरपणात घ्यावी काळजी

भिवंडी परिसरात राहणाऱ्या या महिलेच्या तीव्र डायबिटीजमुळे या बाळाचं वजन जन्मजात ५.४१० किलो एवढं आहे. महिलांमध्ये नसणाऱ्या‌ जनजागृतीमुळे गर्भवती महिला डायबिटिजकडे दुर्लक्ष करतात. पण, त्याचा परिणाम गर्भातील बाळावर ही होतो. त्यामुळे महिलांनी याबाबतची विशेष काळजी घेणे गरजेचं असल्याचं डॉक्टर्स सांगतात.

शस्त्रक्रिया करणे होते कठीण

२६ एप्रिलला प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी आधी तिची प्रकृती स्थिर केली. तिला इन्सुलिन दिल्यावर तिच्या शरीराचं तापमान नियंत्रणात आणलं. तीन दिवसांच्या योग्य उपचारांनंतर तिची सिझेरीन प्रसूती केली गेली. बाळाचं वजन जास्त असल्याने प्रसूतीची शस्त्रक्रिया कठीण आणि जोखमीची असल्याचं कामा हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी सांगितलं.

याविषयी अधिक माहिती देताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी सांगितलं की, ” गर्भवती असताना महिलांना डायबिटीस झाल्यास याचा परिणाम होणाऱ्या बाळावर ही होतो. पण, याबाबत कमी असलेल्या जनजागृतीमुळे महिला काळजी घेत नाहीत. ही डायबिटीक महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर तिची डायबिटीजची तपासणी केली. तेव्हा तिला तीव्र डायबिटीज असल्याचं निदान झालं. या महिलेला असलेल्या डायबिटीजमुळे याचा परिणाम बाळावर होऊन बाळाचं वजन ५ किलो एवढं झालं आहे. “

गर्भवती महिलांना डायबिटीस असल्यास

गर्भवती महिलांनी गरोदरपणात काळजी न घेतल्यास बाळांना शारिरीक आणि मानसिक व्यंगत्व येऊ शकतं. सेलेब्रल पाल्सी नावाचा मानसिक आजार देखील होऊ शकतो. शिवाय, बाळाच्या अवयवांची वाढ खुंटू शकते‌. फुप्फुस आणि हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, गर्भवतींनी गर्भधारणेच्या वेळी डायबिटीज आणि हायपरटेंशन या आजारांची तपासणी करून घ्यावी असा सल्ला कामा हॉस्पिटलच्या निवासी डॉ. जवेरिया काझी यांनी दिला आहे.