घरमुंबईअखेर 'तीरा'ला झुंज देण्यात मिळाली इंजेक्शनची मदत

अखेर ‘तीरा’ला झुंज देण्यात मिळाली इंजेक्शनची मदत

Subscribe

मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात तीराला इंजेक्शन देण्यात आले.

एसएमए टाइप-१ या दुर्धर आजाराशी सामना करण्यासाठी चिमुकल्या तीरा कामतला अखेर इंजेक्शन देण्यात आले आहे. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी १० वाजता तिला इंजेक्शन देण्याची प्रक्रिया सुरु झाली. अखेर आज तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तीराला इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे पुढील चोवीस तास खुप महत्वाचे असणार आहे. यापुढेही तिच्या रक्ताच्या आणि इतर चाचण्या सुरु राहणार आहेत.

मुंबईत राहणाऱ्या चिमुकल्या तीरा कामत एसएमए टाइप ए १ या अतिशय गंभीर आणि दुर्धर आजाराने ग्रासले. तिच्या उपचारांसाठी १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज होती. मात्र हे इंजेक्शन भारतात उपलब्ध नसल्याने तिला उपचारांसाठी अमेरिकेत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र तीराच्या आईवडीलांना एवढा खर्च शक्य नसल्याने अखेर भारतात हे इंजेक्शन मागवण्यात आले. या इंजेक्शनचा १६ कोटींचा खर्च क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून जमवण्यात आला. त्यानंतर
एका महिन्यापूर्वी ते इंजेक्शन ऑर्डर करण्यात आले. गुरुवारी अमेरिकेतून इंजेक्शन भारतात आले. आणि अखेर तीराला शुक्रवारी सकाळी रुग्णालयात ते इंजेक्शन देण्यात आले.

- Advertisement -

या इंजेक्शनसाठी १६ कोटींची रक्कम जमा झाली असली तरी मात्र इंजेक्शन भारतात आणण्यासाठी विविध कर लागून सहा कोटी रुपयांचा अधिकची रक्कम अजून लागणार होती. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या इंजेक्शनवरील विविध कर रद्द केले. त्यामुळे तीराला अखेर ते इंजेक्शन देण्यात आले. परंतु या इंजेक्शनचा परिणाम, दुष्परिणाम काही मुलांमध्ये दिसून येत असल्याने पुढील काहीकाळ आणखी काळजी घ्यावी लागणार असल्याची माहिती तीराच्या वडिलांनी दिली.


हेही वाचा- दहावी, बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -