घरमुंबईबाजारात ५० टक्के निकृष्ट दर्जाचे खाद्य तेल!

बाजारात ५० टक्के निकृष्ट दर्जाचे खाद्य तेल!

Subscribe

अन्न व औषध प्रशासनाकडून ४ कोटींचा खाद्य तेल साठा जप्त

राज्यातील नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) वारंवार विविध दुकानांवर छापा घालण्यात येतो. काही दिवसांपासून एफडीएकडून हे छापासत्र अधिक तीव्र केले आहे. नुकतेच मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, पालघर येथे छापा घालत एफडीएने जप्त केलेल्या नमून्यांपैकी ५० टक्के नमूने निकृष्ट दर्जाचे आढळून आले. या कारवाईत एफडीएने तब्बल ४ कोटींचे खाद्यतेल जप्त केले आहे.

राज्यामध्ये अन्नामध्ये भेसळ करणार्‍यांविरोधात एफडीएने आपला फास आवळण्यासा काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील विविध भागांमध्ये छापे टाकल्यानंतर आता एफडीएने थेट मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, मीरारोड, भिवंडी आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात छापे घातले. बोरिवलीतील आयता इंटरप्रायझेस, गोरेगावमधील अष्टमंगल ऑईल मार्केटिंग प्रा. लि. वसईतील सदानंद ऑईल टे्रडर्स, गुलाब ऑईल अ‍ॅण्ड फूड इंडस्ट्रीज, वाशीमधील गौतम एंटरप्रायझेस, शिवशक्ती एंटरप्रायझेस, भिवंडीतील गॅलक्सी एंटरप्रायझेस आणि मिरारोडमधील आशिर्वाद ऑईल डेपोवर कारवाई करण्यात आली. एफडीएच्या ३० अधिकार्‍यांच्या तुकडीने ही कारवाई केली. या आठ खाद्यतेलाची विक्री करणार्‍या दुकानांमधून तब्बल चार कोटी ९८ लाख ७४ हजार ९७३ किमतीचा खाद्यतेल साठा जप्त केला. या छाप्यात घेतलेल्या ९३ नमून्यांपैकी ४९ नमूने निकृष्ट दर्जाचे आढळून आले. यामध्ये वसईली गुलाब ऑईल अ‍ॅण्ड फूड इंडस्ट्रिजमधील सर्व नमून्यांमध्ये भेसळ केल्याचे आढळून आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

- Advertisement -

खाद्य तेल         जप्त नमूने        अप्रमाणित नमूने
शेंगदाणा तेल       ११                 ०६
मोहरी तेल          १९                 १२
तीळ तेल            ०५                 ०५
सूर्यफूल तेल       २०                 १२
पामोलिन तेल      १३                 ०४
कॉटन सिड तेल    ०२                ०२
कॉर्न तेल            ०१                 ०१
वनस्पती तेल       ०१                 ०१
राईस ब्रान तेल     १०                 १०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -