घरCORONA UPDATE'या' वयातील रूग्णांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये हलवणार; मुंबई महापालिकेचा निर्णय

‘या’ वयातील रूग्णांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये हलवणार; मुंबई महापालिकेचा निर्णय

Subscribe

देशात आजही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आहेत. तर राज्यात मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने रुग्णांना होम क्वॉरंटाईन करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करत एका ठराविक वयोगटातील रुग्णांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आता कोविडची लक्षणे नसलेल्या आणि दीर्घकालीन आजार असलेल्या ५० वर्षीय रुग्णांना घरात क्वॉरंटाईन करणार नसून त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

कोरोनाबाधित रूग्णांमधील ५० ते ६० वर्ष वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावलीमध्ये हे बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांसह अतिरिक्त सूचना म्हणून त्यांचे महानगरपालिका प्रशासनाकडून पालन तसेच अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईतील सध्याच्या गृह विलगीकरण मार्गदर्शक सुचनांनुसार ज्या कोविड रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील. तसेच ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि इतर कोणतेही दीर्घकालीन आजार नसतील शिवाय स्वतंत्र प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध असेल, अशा रुग्णांचे गृह विलगीकरण करण्यात येते.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३४ हजार २२३ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ३५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत १२३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख ८ हजार २६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

हेही वाचा –

वय वर्षे ६५ आणि १८ महिन्यांत तिला झाली ८ मुलं! भ्रष्टाचाराचा अव्वल नमुना!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -