घरमुंबईइंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये अनुभवा 'भारतीय कलाकृती'

इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये अनुभवा ‘भारतीय कलाकृती’

Subscribe

भारतातील ५०० कलाकारांची तब्बल ५ हजार चित्रे नेहरु सेंटरमध्ये इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये ठेवण्यात आली आहेत.

मुंबईच्या वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील ५०० कलाकार या प्रदर्शनात सहभागी झाले असून ५ हजार चित्रांचे प्रदर्शन या फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनात ५ हजार भारतीय कलाकारांची कलाकृती अनुभवायला मिळणार आहे. गुरुवारी इंडिया आर्ट फेस्टिव्हलला मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये सुरूवात झाली आहे. इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे यंदाचे ९ वे वर्ष आहे. यामध्ये मुंबई ते थेट उत्तर भारतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कलांचा समावेश करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये तैलचित्रे, Acrylicमधील चित्रे, जलतरंगातील चित्रे इत्यादी चित्रांचा समावेश आहे.

- Advertisement -

नेहरु सेंटरमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. ९ ते १२ जानेवारीपर्यंत हे फेस्टिव्हल सुरू राहणार असून गुरुवारी या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात ४५ कलादालनांमधील ५०० कलाकारांच्या ५ हजार कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, ४० शहरांमधील २५० कलाकार या महोत्सवात सहभागी झाले आहेत. चित्रांचे प्रदर्शन आणि त्यासोबतच शिल्पे, ओरिजिनल प्रिंट्स, निसर्गचित्रे, फिगरेटिव्हज, Abstract चित्रे या शोमध्ये आकर्षणाचा केंद्रबिदू आहेत.

- Advertisement -

इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारची कला असते. त्यापैकी अशा अनेक कलाकृती आहेत ज्या आपण अनेक तास एकटक बघू शकतो. शिवाय, या कलाकृतींमधून आपल्या भारत देशाच्या विविध संस्कृती देखील समोर येत आहेत. इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये या क्षेत्रात ज्यांना नावलौकिक मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा फेस्टिव्हल राबवण्यात येत असून अनेक कलाकृती सादर केल्या जातात. शहरातील दृश्य, समुद्राचे रंग आणि ग्रामीण भागात होणारा विकास, प्रसंगचित्रे, व्यक्तीचित्रेही रेखाटण्यात आली आहेत.


हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर रात्री विशेष ब्लॉक, ‘या’ गाड्या झाल्या रद्द


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -