घरताज्या घडामोडीनवी मुंबईत ३३० तर पनवेलमध्ये १७१ नव्या रुग्णांची नोंद

नवी मुंबईत ३३० तर पनवेलमध्ये १७१ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३३० तर पनवेल महापालिका क्षेत्रात १७१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज, गुरुवारी ३३० तर पनवेल महापालिका क्षेत्रात १७१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवी मुंबईतील रुग्णांची संख्या १२ हजार ५९९ झाली आहे. तर आज नवी मुंबईतील २११ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८ हजार १३६ एवढी झाली आहे. तर नवी मुंबईत सद्यस्थितीत ४ हजार ९८ Active रुग्ण आहेत. आतापर्यंत नवी मुंबईत ३६५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पनवेल मनपा क्षेत्रातील रुग्णांची संख्या ५ हजार ४२१ झाली असून गुरुवारी १५१ जण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झाले झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ८९५ वर गेली आहे. सध्यस्थीतीत शहरात १ हजार ३९१ Active रुग्ण आहेत. आतापर्यंत १३५ जणांचा कोरोनाने मृत्यू आला आहे.

- Advertisement -

४७०० पोलिसांची होणार Antigen test!

कोव्हीड १९ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेतले आहे. या अनुषंगाने अर्ध्या तासात त्वरित तपासणी अहवाल हातात येणाऱ्या रॅपीड Antigen test सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र तैनात असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रकृतीबद्दलच्या आस्थेने गुरुवारी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात Antigen test ला प्रारंभ करण्यात आला.


हेही वाचा – Thane Corona Update: ठाण्यात आज कोरोनाचे ३१७ नवे रुग्ण, तर ५ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -