घरताज्या घडामोडीराज्यात कोरोनाचे ५०५ नवीन रुग्ण; मुंबईत ९५ रुग्ण कोरोना मुक्त

राज्यात कोरोनाचे ५०५ नवीन रुग्ण; मुंबईत ९५ रुग्ण कोरोना मुक्त

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबईतील १३१ रुग्णांचा समावेश आहे. मात्र मुंबईत ९५ रुग्ण हे औषधोपचाराने बरे झाल्याने ते कोरोना मुक्त झाले आहेत.

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबईतील १३१ रुग्णांचा समावेश आहे. मात्र मुंबईत ९५ रुग्ण हे औषधोपचाराने बरे झाल्याने ते कोरोना मुक्त झाले आहेत. राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (505 new corona patients in the state 95 patients corona free in Mumbai vvp96)

मात्र समाधानाची बाब म्हणजे सोमवारी शासन व पालिका रुग्णालयात कोरोना बाधित एकही रुग्ण दगावल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या १९ हजार ७५४ स्थिरावली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी २४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चार रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोना बाधित ९५ रुग्ण औषधोपचार घेऊन बरे झाल्याने सोमवारी ९५ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले.

- Advertisement -

सोमवारी मुंबईत कोरोना बाधित १३१ नवीन रुग्णांची तर संपूर्ण राज्यात ५०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६० हजार ६८२ वर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १,६९९ एवढी आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ५६ हजार ३४४ वर पोहोचली आहे. तर, ६,०८७ सक्रिय रुग्ण आहेत.


हेही वाचा – अजित पवार जी भूमिका घेतील ती १०० टक्के मान्य; कट्टर समर्थकाचे दादांना जाहीर समर्थन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -