घरमुंबईCorona Vaccination : लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील ५२ खासगी लसीकरण केंद्र ठप्प, महापालिकेची...

Corona Vaccination : लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील ५२ खासगी लसीकरण केंद्र ठप्प, महापालिकेची माहिती

Subscribe

मुंबईत सलग सहाव्या दिवषी लसींच्या तुटवड्यामुळे खासगीसह सरकारी अशी ५४ खासगी लसीकरण केंद्रे ठप्प झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यातील फ्कत दोन सरकारी लसीकरण केंद्रही बंद ठेवण्यात आली आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे अनेक केंद्रांवर लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांवर लसीचा पुरवठा मर्यादित असल्याकारणाने काही लसीकरण केंद्रे पूर्णपणे खुले/अंशतः खुले किंवा पूर्णपणे बंद राहतील. अशी माहिती पालिकेने दिली आहेत.

- Advertisement -

दरम्यान इतरही लसीकरण केंद्रावर लसींचा मर्यादीत साठा असल्याने ७४ हून अधिक खासगी लसीकरण केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यातील १८ लसीकरण केंद्रावरही मर्यादित साठा असल्याने या १८ लसीकरण केंद्रांवरही लसीकरण मोहिम बंद होण्याच्या मार्गावर आहे. लस टोचून घेण्यासाठी मुंबईकर अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत मात्र काही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड पाहून पून्हा माघारी परतावे लागत आहे.

पुरसे डोस सध्या पालिकेकडे उपलब्ध नसल्याने फक्त खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांवरच नागरिकांना लस दिली जात आहे. दरम्यान सद्यस्थितीत मुंबईत पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने खासगी केंद्रांना डोस उपलब्ध करुन देणे पालिकेला अवघड जात आहे. दरम्यान १ मेपासून १८ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र असेच जर खासगी लसीकरण केंद्र बंद झाली तर पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणत गर्दी करण्याची शक्यता आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -