घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत २४ तासांत ५३ कोरोनाचे बळी, १,१०० नव्या रुग्णांची नोंद!

Corona Update: मुंबईत २४ तासांत ५३ कोरोनाचे बळी, १,१०० नव्या रुग्णांची नोंद!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १०० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १४ हजार २८७वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ६ हजार ३५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ६८९ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत ८७ हजार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

आज मुंबईत ७८७ संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भरती होण्याची संख्या ८० हजार ७२६वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत २० हजार ५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३६ रुग्ण पुरुष आणि १७ रुग्ण महिला होत्या. तसेच ४५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ४० जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे. ३० जुलैपर्यंत मुंबईत ५ लाख २६ हजार ९८२ कोविड-१९च्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर ७६ दिवस आहे. आज धारावीत ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धारावीत कोरोनाबाधितांचा संख्या २ हजार ५५६वर पोहोचली आहे. तसेच सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: राज्यात आज दिवसभरात आढळले १०,३२० नवे रुग्ण, २६५ मृत्यूमुखी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -