घरताज्या घडामोडीमुंबईत रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी 54 जणांना अटक

मुंबईत रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी 54 जणांना अटक

Subscribe

संबंधित बाईकस्वार स्टंटबाजी करुन स्वतसह इतर वाहनचालकांच्या जिवाशी खेळ करीत होते. त्यामुळे अशा बाईकस्वाराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती.

मुंबई शहरात रविवारी रात्री उशिरा वाहतूक पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी 54 जणांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेले 51 बाईक जप्त केले आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. मुंबई शहरात पश्चिम दुतग्रती महामार्गावर रॅश ड्रायव्हिंग आणि बाईक रेसिंगचे प्रकार होत असल्याने अपघाताच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. संबंधित बाईकस्वार स्टंटबाजी करुन स्वतसह इतर वाहनचालकांच्या जिवाशी खेळ करीत होते. त्यामुळे अशा बाईकस्वाराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती.

रविवारी रात्री उशिरा वरळी, वांद्रे आणि सांताक्रुज परिसरात अशा बाईकस्वाराविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. स्वत: अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पडवळ हे कारवाईदरम्यान तिथे उपस्थित होते. या कारवाईदरम्यान रात्री उशिरा हाजीअली येथून बारा बाईकस्वार वरळीच्या दिशेने येत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजवर दिसले होते. त्यानंतर या पथकाने वरळी येथून या बाराजणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ बाईक जप्त केल्या. वांद्रे वाहतूक पोलिसांनी दोन गुन्ह्यांची नोंद करुन काही तरुणांना अटक करुन त्यांच्याकडून 28 बाईक जप्त केल्या. तसेच इतर कारवाईत अन्य बाईकस्वारांवर कारवाई करुन त्यांच्याकडून पोलिसांनी बाईक जप्त केले होत्या. रविवारी रात्री 54 जणांना अटक करण्यात आली तर त्यांच्याकडून 51 बाईक जप्त करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – हँकॉक पूल पुनर्बांधणी; समन्वयकाला आणखीन दीड कोटी रुपयांची खैरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -