Omicron Variant: मुंबईत ‘ओमायक्रॉन’चे ५५ टक्के रुग्ण

कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत सातव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर

Mumbai Corona Update 536 new corona cases and 3 death registered in 24 hours
Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी ५३६ रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

मुंबईत कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत सातव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, मुंबईतील २८२ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांपैकी, ‘ओमायक्रॉन’चे ५५ टक्के म्हणजे १५६ रुग्ण, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के म्हणजे ८९ रुग्ण’ तर ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के म्हणजे ३७ रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २८२ रुग्ण हे मुंबईतील नागरिक आहेत.

या २८२ रुग्णांमध्ये, ० ते २० वर्षे वयोगट – ४६ रुग्ण (१६ टक्के), २१ ते ४० वर्षे वयोगट – ९९ रुग्ण (३५ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगट – ७९ रूग्ण (२८ टक्के), ६१ ते ८० वयोगट – ५४ रुग्ण (१९ टक्के) तर ८१ ते १०० वयोगट – ४ रुग्ण (१ टक्के) यांचा समावेश आहे.

दरम्यान, ‘ओमायक्रॉन’ विषाणूची बाधा झालेल्या १५६ पैकी फक्त ९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. तसेच, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला नाही अथवा त्यांना अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही.

या २८२ पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये ३२ जण मोडत असून त्यापैकी ४ जणांना डेल्टा व्हेरिअंटची, १२ जणांना डेल्टा डेरिव्हेटीव्हची तर १६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे.

कोविड लस घेतल्यावरही कोविडची बाधा

सदर, २८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामध्ये, पहिला डोस घेतलेल्या तीन रुग्णांचा समावेश आहे. तसेच, दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी १० रुग्णांचा आणि लसीचा एकही डोस न घेतलेल्या ४ रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित २ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एक ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेह व अतिदाबाचा त्रास होता. तसेच त्यांनी कोविड लसीचा एकच डोस घेतला होता.


हेही वाचा – Mumbai corona virus Update: मुंबईत वर्षाच्या शेवटच्या दिवशी ५,६३१ नव्या रुग्णांची नोंद