घरमुंबईविक्रोळी येथील अपघातात ५५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू; बसचालकास अटक

विक्रोळी येथील अपघातात ५५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू; बसचालकास अटक

Subscribe

विक्रोळी येथील अपघातात ५५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून याप्रकरणी बसचालकास अटक करण्यात आली आहे.

विक्रोळी येथील अपघातात एका ५५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालकास अटक केली आहे. किशनराम हरिराम बिष्णोई असे या चालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला कोर्टाने जामिनावर सोडून दिले आहे.

नेमके काय घडले?

विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील मुंबई-ठाणे वाहिनी, ऐरोली ब्रिजजवळ शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ५५ वर्षाचा एक व्यक्ती शनिवारी सकाळी ऐरोली ब्रिजजवळून पायी जात होता. यावेळी तिथे भरवेगात जाणार्‍या एका खाजगी बसने त्याला धडक दिली. या धडकेत ती व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे उपचारा आधीच त्या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी नितीन कैलास माळी यांच्या तक्रारीवरुन विक्रोळी पोलिसांनी बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून हा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बोनस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -