घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! सलग तिसऱ्या दिवशी ५ हजारांहून अधिक रुग्णांची...

Corona Update: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! सलग तिसऱ्या दिवशी ५ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ

Subscribe

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची वाढ मुंबईत झाली आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ५१३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८५ हजार ६२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ६२९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या ९ रुग्णांपैकी ७ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि २ महिलांचा यामध्ये समावेश होता. ९ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत १ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ३५ हजार २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४७ हजार ५०४ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ३८ लाख ८८ हजार ८७३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहे.

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के आहे. १९ मार्च ते २५ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाचा वाढीचा दर ०.९८ टक्के इतका आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ६८ दिवस आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या सक्रिय झोन ४३ आहेत. ४९७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: चिंताजनक! रेकॉर्ड ब्रेक रुग्ण नोंदीची हॅटट्रिक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -