घरमुंबईबालरक्षक मोहिमेतून 580 विद्याथ्यार्र्ंचे प्रवेश

बालरक्षक मोहिमेतून 580 विद्याथ्यार्र्ंचे प्रवेश

Subscribe

शाळाबाह्य मुले, शाळेत अनियमित असणारी मुले यांना शाळेत आणण्यासाठी व त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘बालरक्षक’ मोहीम सुरू केली. या मोहीमेंतर्गत तीन महिन्यात तब्बल 580 मुलांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. 245 शिक्षकांनीही या मोहीमेत बालरक्षक म्हणून नोंदणी केली आहे.

शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी राज्यातील नागरिकांपासून अधिकार्‍यांपर्यंत कोणत्याही व्यक्तीला ‘बालरक्षक’ बनून शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणात योगदान देता यावे यासाठी राज्यभरात ही मोहीम राबवण्यात आली. राज्याच्या विविध भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अद्यापही प्रचंड मोठे आहे. मध्यंतरी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून शाळाबाह्य मुलांची राज्यातील संख्या पुढे आली होती. मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विविध ठिकाणी राहणारी तसेच स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्त, सिग्नल आदीपर्यंत बालरक्षक पोहचून मुंबईत 580 मुले शाळेत दाखल केली असल्याची माहिती समन्वयक वैशाली शिंदे यांनी दिली. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याचे काम बालरक्षकांनी केले आहे. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग वाढला तर आणखी मुलांपर्यंत पोहचता येईल असेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

बालरक्षकसाठी ऑनलाइन नोंदणी

बालरक्षक म्हणून नोंदणीसाठी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या संकेतस्थळावर आतापर्यंत 245 शिक्षकांनी बालरक्षक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -