घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईकरांनो सावधान! रुग्णसंख्या ६ हजारांच्या पार

Mumbai Corona Update: मुंबईकरांनो सावधान! रुग्णसंख्या ६ हजारांच्या पार

Subscribe

मुंबईत आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांनी तब्बल ६ हजरांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. मुंबईत आज ६ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत आज ३ हजार ३२० रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले आहेत. मुंबईत सध्या ४५ हजार १४० अँक्टिव रुग्ण आहेत. मुंबईत आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एकूण ४६ हजार ४५० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६३४ कोरोबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत मुंबईत ३ लाख ४० हजार ९३५ कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ३९ लाख ८३ हजार ३८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबूईत कोरोना रुग्णांचा दर हा ८६ टक्के इतका आहे. २१ मार्च ते २७ मार्च पर्यंतचा विचार केला असता कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.१७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ५७ सक्रिय कटेंनमेन झोन आहेत. तर ५६९ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी रविवारपासून रात्रीची संचार बंदी जाहिर केली आहे. मुंबईसह राज्यात रात्रीची संचार बंदी असणार आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मिशन बिगीनच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने नवी नियमावली जाहिर केली आहे. त्याचप्रमाणे होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावरही कडक निर्बंध लागू केले आहे.


हेही वाचा – New Guidelines: राज्यात मिशन बिगिन अगेन; वाचा कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -