घरमुंबईपालिका शाळेतील ६० टक्के विद्यार्थ्यांना दातांचे विकार

पालिका शाळेतील ६० टक्के विद्यार्थ्यांना दातांचे विकार

Subscribe

लहान मुलं अनेकदा योग्य पद्धतीने ब्रश करत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या दातांना किड लागते. यातून, मुलांचे दात कमी वयातच काढावे लागतात. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली गेली. या तपासणीअंती तब्बल ६० टक्के मुलांचे दात किडल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेद्वारे पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक तपासणीसह मौखिक तपासणी मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत पालिका शाळेतील दोन लाखांहून अधिक मुलांची तोंडाची तपासणी करण्यात आली असून यातील ६० टक्के मुलांमध्ये दात किडलेले आढळून आले आहेत.

पालिकेच्या १ हजार १८७ शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. या शाळांमधील १ लाख १५ हजार ३६८ विद्यार्थ्यांना दात किडण्याची समस्या आढळल्या आहेत. तसंच, ३४ हजार ८०७ विद्यार्थ्यांवर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. या मोहिमेत दातांच्या आरोग्यासोबत शारिरीक आजारांबाबतीत ही तपासणी केल्या गेल्या.

- Advertisement -

राज्य सरकारद्वारे पालिका प्रशासन मुंबईतील सर्व पालिका शाळा आणि बालवाडीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर गेल्या कित्येक वर्षांपासून राबवल्या जातात. या शिबिरात विविध शारीरिक तपासण्यांसह दंत चाचणी सुद्धा केली जाते. या चाचणीत अनेक शालेय मुलांच्या दातांमध्ये समस्या असल्याचं आढळत आहे. यात मुख्यतः दातांना किड असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या मुलांना पालिकेची रुग्णालये आणि दवाखाने या ठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतंर्गत मोफत उपचार करून दिले जातात.
– डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिकेच्या आरोग्य विभाग

लहान मुलांमध्ये प्रामुख्याने, दात दुखणं, दाताला कीड लागणं, हिरड्यातून रक्त येणं आणि सूज असणं, दात पिवळे पडणं अशा समस्या दिसून आल्या. मुलांना पौष्टीक आहार आणि तोंडाची स्वच्छता कशी ठेवावी, याबाबत मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. या तपासणीत दातांच्या १ लाख १५ हजार ३६८, कमी वजनाची ७ हजार ३८३, कान, नाक, घसा या आजारांनी ग्रस्त असलेले ४४ हजार ५२१ एवढी मुलं आढळली आहेत. तसंच, १ हजार ६४६ मुलांना शारीरिक आजार असल्याचं आढळलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

नाराज अबू आझमी यांना आघाडीत घेण्यात काँग्रेसला यश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -