घरमुंबईजेजेने बांधल्या ६०० तरुणांच्या लग्नगाठी

जेजेने बांधल्या ६०० तरुणांच्या लग्नगाठी

Subscribe

लग्नाच्या मुलामुलींसाठी चष्मा हा एक प्रकारचा अडथळाच ठरतो. चष्मा असलेला मुलगा किंवा मुलगी यांना लग्नासाठी सर्रासपणे नकार मिळतो. यामुळे अनेक मुलामुलींची लग्ने जुळणे कठीण होऊन बसते. अशा या तरुणांसाठी जे.जे. रुग्णालयातील लेसिक विभाग वरदान ठरला आहे.

सध्या फार कमी वयामध्येच अनेकांना चष्मा लागतो. पण या चष्म्यामुळे अनेकांच्या सामजिक आयुष्यावर परिणाम होताना दिसतो. तरुणांमध्ये चष्मा हा एक प्रकारचा स्टाईल स्टेटमेंट ठरत असला तरी लष्कर किंवा पोलीस दलाच्या नोकरीसाठी तो अडचणीचा ठरत आहे. त्यातच लग्नाच्या मुलामुलींसाठी चष्मा हा एक प्रकारचा अडथळाच ठरतो. चष्मा असलेला मुलगा किंवा मुलगी यांना लग्नासाठी सर्रासपणे नकार मिळतो. यामुळे अनेक मुलामुलींची लग्ने जुळणे कठीण होऊन बसते. अशा या तरुणांसाठी जे.जे. रुग्णालयातील लेसिक विभाग वरदान ठरला आहे. या विभागाचे डॉक्टर शशी कपूर यांनी आतपर्यंत 600 हून अधिक तरुण तरुणींच्या डोळ्यावर लेझर शस्त्रक्रिया करुन त्यांची चष्म्यापासून कायमची सुटका केली आहे. चष्मा गेल्याने त्यांच्या लग्नातील अडथळा दूर होऊन त्यांची लग्न ठरली, असे डॉ. शशी कपूर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

दृष्टी कमी झालेल्यांसाठी चष्मा जरी वरदान ठरत असला तरी लग्न ठरण्यात मात्र हा अडथळाच ठरतो. चष्म्यामुळे लग्न जुळत नसलेले अनेक तरुण व तरुणी माझ्याकडे येतात. आतापर्यंत 250 मुली आणि 400 मुलांवर लेसिक शस्त्रक्रिया करुन त्यांचा चष्मा कायमस्वरुपी घालवला आहे. ही शस्त्रक्रिया करुन चष्मा घालवल्यानंतर अवघ्या काही महिन्यात या तरुण व तरुणींचे लग्न ठरल्याचे जे.जे. हॉस्पिटलमधील नेत्रतज्ञ व लसिथ विभागातील डॉ शशी कपूर यांनी सांगितले. आतापर्यंत तब्बल आठ हजार जणांच्या शस्त्रक्रिया केल्या असून महिन्याला किमान 200 शस्त्रक्रिया केल्या जातअसल्याचे कपूर यांनी सांगितले.जे. जे. हॉस्पिटलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सरकारकडे पाठपुरावा करुन ही मशीन मागवून घेतली. खाजगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 50 हजारपेक्षा अधिक खर्च येतो. तर जे. जे.त ही शस्त्रक्रिया अवघ्या 10 हजारात होते. रुग्ण जर केशरी रेशन कार्ड धारक असेल तर ती मोफत होते.पोलीस, मर्चंट नेव्ही, आर्मी, शीप, कोळी, विद्यार्थी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या तरुण-तरुणी शस्त्रक्रियेसाठी येतात.

- Advertisement -

8 ते 45 वर्षांपर्यंत उपचार शक्य
18 व्या वर्षापासून 45 व्या वर्षापर्यंत ही शस्त्रक्रिया करून चष्म्यापासून मुक्ती मिळवता येते. ही शस्त्रक्रिया फारच सोपी असून अवघ्या 10 मिनिटात तुम्हाला घरी सोडण्यात येते. त्यामुळे दररोज 30-40 तरुण उपचारासाठी रुग्णालयामध्ये येतात. मात्र वयाच्या 45 वर्षानंतरच्या व्यक्तीला वाचनासाठी चष्म्याची गरज लागते. -डॉ. शशी कपूर, नेत्रसर्जन

काय आहे शस्त्रक्रिया
चष्मा लागलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील रेटिनावर एक थर जमा झालेला असतो. या थरामळे त्याला चष्मा लावावा लागतो. शस्त्रक्रियेत लेझर किरणांद्वारे रेटिनावर जमा झालेला थर दूर केला जातो. यामुळे तुमचा चष्मा दूर होतो. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची शारिरीक आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्याच्या शस्त्रक्रियेचा दिवस निश्चित केला जातो. दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला 10 मिनिटांहून अधिक वेळ लागत नाही. शस्त्रक्रिया संपताच लगेच रुग्णाला घरी सोडण्यात येते. त्यानंतर आठवडाभर डोळ्यावर ताण येईल असे वाचन व टीव्ही पहाणे टाळावे, असा सल्ला शशी कपूर यांनी दिला. यामध्ये कोणत्याही प्रकारची चिरफाड अथवा डोळ्यावर पट्टी लावावी लागत नाही. ही फारच साधी शस्त्रक्रिया आहे.

- Advertisement -

देशात प्रथमच सरकारी हॉस्पिटलमध्ये मशीनसरकारी हॉस्पिटलमध्ये केवळ शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येतात असा समज आहे. पण जे. जे. हॉस्पिटलमध्ये लेसिथ शस्त्रक्रिया ही तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच केली जाते. स्वत: डॉ. कपूरच यांच्याकडेच ही जबाबदारी आहे. डॉ. कपूर यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये १९९१ मध्ये लेसिथ मशीन आणली होती. 30 वर्षांपासून डॉ. कपूर ही शस्त्रक्रिया करत आहेत. जे. जे. हॉस्पिटलमध्ये ही मशीन आठ वर्षांपूर्वी आणली. तेव्हा कपूर यांनी पुढाकार घेऊन शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखवली. सरकारी हॉस्पिटल्समध्ये ही मशीन असणारे जे.जे. हे एकमेव आहे.

शशी कपूर यांची समाजसेवाडॉ.शशी कपूर आठवड्यातून तीन दिवस जे.जे. हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. यासाठी ते मासिक दीड हजार रुपये इतके नाममात्र मानधन घेतात. ही शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून रुग्ण येत असले तरी शस्त्रक्रियेची माहिती लोकांना नसल्याने जे.जे. मधील मशीन पूर्ण क्षमतेने वापरले जात नाही.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -