घरताज्या घडामोडीLockDown: बायकोने ओतले नवऱ्याच्या अंगावर उकळलेले पाणी; कारण ऐकून व्हाल अचंबित

LockDown: बायकोने ओतले नवऱ्याच्या अंगावर उकळलेले पाणी; कारण ऐकून व्हाल अचंबित

Subscribe

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊन दरम्यान कौटुंबिक वाद वाढताना दिसत आहे. छोट छोट्या कारणांवरून आत्महत्या, मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान मुंबईत एका ६२ वर्षीय महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीच्या अंगावर उकळलेले पाणी ओतल्याची घटना घडली आहे.

पती हॉलमध्ये झोपला होता आणि पत्नीने पतीला बेडरूममध्ये झोपायला सांगितले. त्याचवेळेस दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नीने हे पाऊल उचलले. त्यानंतर पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पतीने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळल्यानंतर यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. ही घटना मुंबईतील बोरीवली पश्चिमेला घडली आहे.

- Advertisement -

पती ए.ए. दळवी आणि त्याची पत्नी शहेनाझ ओल्ड एमएचबी कॉलनीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहेनाझ ही नेहमीच छोट छोट्या गोष्टींमध्ये भांडत असते. तिच्यापासून भांडणाला सुरुवात होत. शहेनाझच्या या वागणूकीमुळे त्यांचा मुलगा देखील काही वर्षांपूर्वी घर सोडून गेला, असे पतीने सांगितले. पतीच्या तक्रारीनुसार, ७ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या फ्लॅटमधील हॉलमध्ये झोपत होता. त्याचवेळेस शहेनाझने त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली आणि त्याला बेडरूम मध्ये झोपायला सांगितले. पण शहेनाझच्या बोलण्याकडे पतीने दुर्लक्ष केले. काही वेळाने ती शिवीगाळ करू लागली. तरीदेखील तो तिला काहीही बोलला नाही. मग त्याने शहेनाझला ओरडल्यामुळे झोप येत नसल्याचे सांगून गप्प राहण्यास सांगितले. त्यावेळी ती रागाच्या भरात स्वयंपाकघरात गेली आणि थोड्यावेळाने शहेनाझने उकळलेले पाणी पतीच्या थेट अंगावर ओतले.

यामुळे पतीची छाती, घसा आणि हात भाजले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पतीला तातडीने कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण त्यानंतर त्याला कपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तीन दिवसांनी डिस्चार्ज दळवीला मिळाल्यानंतर शहेनाझ विरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी शेहनाझ विरोधात कलम ३२४, ३३८, आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमएचबी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे म्हणाले की, अद्याप या प्रकरणाची चौकशी करत असल्यामुळे कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. सध्या दोघेही पती-पत्नी एकत्र राहत आहेत.


हेही वाचा – मणिपुरच्या तरुणीला कोरोना म्हणून मारली हाक आणि केला प्राणघातक हल्ला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -