घरताज्या घडामोडीराज्यात ६३२ पक्ष्यांवर संक्रात

राज्यात ६३२ पक्ष्यांवर संक्रात

Subscribe

मकरसंक्रांतीचा दिवस राज्यातील ६६२ पक्ष्यांसाठी मात्र, 'संक्रांती'चा ठरला आहे.

मकरसंक्रात म्हणजे आनंदोत्सव. या दिवशी पतंग उंच आकाशात उडवण्याची परंपरा आहे. परंतु, तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश मात्र, राज्यातील ६६२ पक्ष्यांसाठी मात्र, ‘संक्रांती’चा ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घातक मांजामुळे राज्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी ५२८ पक्षी आणि १६ प्राणी जखमी झाले आहेत. तर १०४ पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक पक्ष्यांचे पंख कापले तर काहींचे पाय कापले गेले आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नागपूर आणि अकोला अशा ११ शहरांमधील ही आकडेवारी आहे.

बंदी असतानाही चिनी, नायलॉन मांजाचा वापर

चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही बुधवारी अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला. हा मांजा घातक असल्याचे अनेकदा सांगून देखील या मांज्याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. २०१५ साली एका जनहित याचिकेनंतर कोर्टाने या मांजावर बंदी घातली. २०१८ साली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काचेचे लेपन असलेल्या नायलॉन, तंगूसच्या उत्पासदनासह विक्रिवर बंदी घातली. मात्र, तरी देखील याची विक्री थांबली नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

सर्वाधिक मुंबईत जखमी

सर्वाधिक ४२० पक्षी मुंबई परिसरात जखमी झाले असून दक्षिण मुंबईत १५२, वांद्रे ते दहिसर परिसरात १७९, नवी मुंबई परिसरात ८९ पक्षी जखमी झाले आहेत. तर दक्षिण मुंबईत ५, उपनगरात ८ आणि नवी मुंबईत ३ प्राणी जखमी झाल्याची माहिती अहिंसा संघाने दिली असून सध्या जखमी पक्षी, प्राण्यांवर या संघांकडून उपचार केले जात आहेत. तर औरंगाबादमध्ये दोन पक्षी जखमी झाले आहेत तर जळगावमध्ये ३, अकोल्यात ५ पक्षी जखमी झाले आहेत. त्यातील एक बगळा आणि कबुतराचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापुरात दिवसात ५ घार आणि एक कावळा जायबंदी झाले. तर नाशिकमध्ये एक कबुतर आणि एक वटवाघूळ मरण पावले आहे.

याठिकाणी एकही नोंद नाही

राज्यात अनेक शहरांत बुधवारी पक्षी जखमी झाल्याची नोंद असली तरी, अहमदनगर, सातारा आणि सोलापूरमध्ये मात्र, तशी कुठलीही घटना नोंद झाली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – थंडीचा कडाका वाढला; मुंबई बनले हिल स्टेशन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -