घरताज्या घडामोडी'हर घर तिरंगासाठी' ७ कोटींचा खर्च; मग २५ कोटींचा निधी का उभारता,...

‘हर घर तिरंगासाठी’ ७ कोटींचा खर्च; मग २५ कोटींचा निधी का उभारता, काँग्रेसचा पालिकेला सवाल

Subscribe

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सरकारी, खासगी इमारती, झोपडपट्टीत घरघरांवर 'भारतीय तिरंगा' फडकविण्यात येणार आहे. पालिकेकडून घरोघरी मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असून त्यासाठी पालिका ७ कोटींचा खर्च करणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सरकारी, खासगी इमारती, झोपडपट्टीत घरघरांवर ‘भारतीय तिरंगा’ फडकविण्यात येणार आहे. पालिकेकडून घरोघरी मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असून त्यासाठी पालिका ७ कोटींचा खर्च करणार आहे. असे असताना त्यासाठी माजी नगरसेवक, उद्योजक यांच्या माध्यमातून तब्बल २५ कोटींचा निधी का उभारण्यात येत आहे, असा सवाल कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. (7 crore spent on Har Ghar Tiranga Then why raise a fund of 25 crores Congress asked the municipality)

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत मुंबईत तब्बल ५० लाख तिरंगा मोफत वाटण्यात येणार आहे. महापालिकेच्या शाळा, विविध कार्यालये, रुग्णालये, उद्याने आदी ठिकाणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे ‘लेझर शो’ देखील होणार आहे. त्यामुळे या एकूणच कार्यक्रमासाठी सदर निधी खर्च होणार आहे, असा पालिकेचा दावा आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारचे ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान चांगले आहे. मात्र त्यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च येणार असताना माजी नगरसेवक व उद्योजक यांच्याकडून तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यास काँग्रेसचे रवी राजा यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी होण्यापूर्वीच त्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या अभियानाला राजकीय वळण लागण्याची आणि त्यातून भाजप व कॉंग्रेस हे आमने- सामने येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा – राज्यात 2 हजार 138 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 2269 कोरोनामुक्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -