घरमुंबईमुंबई-पूणे एक्सप्रेस हायवेवर ७ दिवसांचा ब्लॉक

मुंबई-पूणे एक्सप्रेस हायवेवर ७ दिवसांचा ब्लॉक

Subscribe

दरड हटवण्यास मागितली एका दिवसाची परवानगी

अवघ्या एक दिवस आधी अर्ज देऊन मुंबई – पुणे एक्सप्रेस हाययेवर दरड हटवण्याचे काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने परवानगी मागितली आहे. पावसाळ्यापूर्वीचे काम असल्यानेच कोणताही धोका न पत्करता वाहतूक पोलीस विभागाला परवानगी देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच आजपासूनच मुंबई-पूणेे एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक घेण्याची सुरूवात झाली आहे.

मुंबई-पूणे एक्सप्रेस हायवेवर सात दिवसांत दररोज सात वेळा दोन्ही दिशेची वाहतूक ही प्रत्येकी १५ मिनिटे बंद ठेवण्यात येणार आहे. दरड कोसळणार्‍या क्षेत्रात लुज स्केलिंगचे काम करण्यासाठी हे काम हाती घेण्यात येणार आहे. खंडाळ्याच्या अमृतांजन ब्रिजनजीक ढिले झालेले दगड काढण्यासाठी संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या कामाला सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात दरड कोसळून मुंबई-पूणे एक्सप्रेस हायवे ठप्प होऊ नये म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून हायवे बंद ठेवून हे दगड काढण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रत्येक ब्लॉक हा 15 मिनिटे कालावधीचा असेल असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. १४ मे १७ मे दरम्यान तसेच २१ मे ते २३ मे दरम्यान हे ब्लॉकचे काम हाती घेण्यात आले आहे. दररोज प्रत्येक पंधरा मिनिटांसाठी हा ब्लॉक असणार आहे. महत्वाचे म्हणजे विकेंडचे दिवस टाळून कमी गर्दीच्या दिवसांमध्ये हे काम हाती घेण्यात आले आहे. ब्लॉकच्या दिवसांमध्ये दररोज सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला १५ मिनिटांसाठी वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

आगाऊ परवानगी घेणे गरजेचे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऐनवेळी मुंबई-पूणे एक्सप्रेस हायवेवर काम करण्यासाठी परवानगी मागितल्यासाठी पोलीस विभागाने एमएसआरडीसीला चांगलाच चिमटा काढला आहे.यापुढे एक्सप्रेस हायवेवर काम करण्यासाठी १० दिवस आधी पत्र व्यवहार करावा, अन्यथा परवानगी मिळणार नाही, असे एमएसआरडीसीला बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -