नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या बातमीने रुग्णाचे नातेवाईक संतप्त

7 people die after drinking sanitizer in yavatmal

नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये दिवसभरात ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने मृतांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला होता. अखेर उशिरा रात्री पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला.

वसईत सोमवारी सकाळपासूनच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात माजी महापौर राजीव पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल करून त्यामध्ये नालासोपाऱ्यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका नगरसेवकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे, सकाळपासून वातावरण तंग झाले होते.

नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये दिवसभरात ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. रात्री हे रुग्ण ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने दगावल्याची बातमी पसरली आणि वातावरण तंग झाले. रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला. त्यात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारीही सामील झाल्याने गोंधळ अधिक वाढला होता. अखेर तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजून शांत केले.

७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही घटना घडलेली नाही. सात वाजता ऑक्सिजनची तपासणी केली तेव्हा आणखी चार तास पुरेल इतका साठा उपलब्ध होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची रक्कम भरायची असेल तर भरू शकतात किंवा भरायचे की नाही त्याबाबत त्यांनीच निर्णय घ्यावा असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आल्याचेही कांबळे यांनी सांगितले.