घरताज्या घडामोडीधारावीतील आजवरची सर्वात कमी रुग्ण संख्या; जाणून घ्या किती रुग्ण आढळले

धारावीतील आजवरची सर्वात कमी रुग्ण संख्या; जाणून घ्या किती रुग्ण आढळले

Subscribe

धारावीतील आजवरची सर्वात कमी रुग्ण संख्या आढळून आली आहे.

धारावीत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच मागील जून महिन्यापासून ही संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, शनिवारी दिवसभरात धारावीत केवळ ७ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आजवरची ही सर्वांत कमी रुग्ण संख्या आहे.

धारावी, माहिम आणि दादर या जी-उत्तर विभागात दिवसभरात एकूण ३४ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत या विभागांमध्ये एकूण रुग्ण संख्या ३ हजार ६९६ एवढी झाली आहे. यामध्ये धारावीत दिवसभरात ७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्ण संख्या २ हजार १५८ वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये दिवसभरात ९ रुग्ण तर माहिममध्ये त्याच्या दुप्पट अर्थात १८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे या दोन्ही भागांमध्ये अनुक्रमे एकूण रुग्ण संख्या ६३३ आणि ९०२ एवढी झाली आहे.

- Advertisement -
  • १ जून २०२० : रुग्ण संख्या ३४
  • २ जून २०२० : रुग्ण संख्या २५
  • ३ जून २०२० : रुग्ण संख्या १९
  • ४ जून २०२० : रुग्ण संख्या २३
  • ५ जून २०२० : रुग्ण संख्या १७
  • ६ जून २०२० : रुग्ण संख्या १०
  • ७ जून २०२० : रुग्ण संख्या १३
  • ८ जून २०२० : रुग्ण संख्या १२
  • १० जून २०२० : रुग्ण संख्या ११
  • ११ जून २०२० : रुग्ण संख्या २० (म़त्यू २)
  • १२ जून २०२० : रुग्ण संख्या २९(म़त्यू २)
  • १३ जून २०२० : रुग्ण संख्या १७
  • १४ जून २०२० : रुग्ण संख्या १३
  • १५ जून २०२० : रुग्ण संख्या २५
  • १६ जून २०२० : रुग्ण संख्या २१
  • १७ जून २०२० : रुग्ण संख्या १७, (म़त्यू १)
  • १८ जून २०२० : रुग्ण संख्या २८
  • १९ जून २०२० : रुग्ण संख्या १७
  • २० जून २०२० : रुग्ण संख्या ०७

    हेही वाचा – मुंबईत पाऊस काही दिवस घेणार विश्रांती


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -