घरमुंबई७१ टक्के ज्येष्ठ मानसिक आजाराने त्रस्त!

७१ टक्के ज्येष्ठ मानसिक आजाराने त्रस्त!

Subscribe

या अहवालासाठी मुंबई आणि उपनगरातील जवळपास १०० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतरचे निष्कर्ष अहवालात मांडण्यात आले आहेत.

शारीरिक स्वास्थ्याप्रमाणेच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण आपण नेहमीच मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. दैनंदिन जीवनात प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागतो. याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना मानसिक आजारांना बळी पडावे लागते. दरम्यान वृद्धांमधील मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जवळपास ७१ टक्के ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतीशी निगडित मानसिक आजार आढळतात. त्यांपैकी ३३ टक्के रुग्णांमध्ये नैराश्य, स्मृतीभ्रंश, स्क्रिझोफ्रेनिया, आयसोमेनिया, तसेच मद्याशी संबंधित मानसिक आजार आढळले आहेत, अशी माहिती सायन हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या डॉक्टरांना संशोधनात्मक अभ्यासात दिली आहे. नुकतेच हे संशोधन ‘इंडियन जर्नल ऑफ मेंटल हेल्थ’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

काय म्हटले आहे संशोधनात?

या अहवालासाठी मुंबई आणि उपनगरातील जवळपास १०० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतरचे निष्कर्ष अहवालात मांडण्यात आले आहेत. त्यानुसार ३३ टक्के रुग्ण नैराश्य, स्मृतिभ्रंश, आयसोमेनिया, दारूशी संबंधित मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे आढळले आहे. महत्त्वाचे म्हणजे या मानसिक आजाराचा त्यांच्या दैनंदिन कामावर कोणताच परिणाम होत नसल्याने त्यांनी कोणतेही उपचार किंवा तपासण्या केल्या नसल्याचे देखील समोर आले आहे.

- Advertisement -

शारीरिक, आर्थिक शोषण

दरम्यान मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने ५२.४ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक तसेच मानसिक शोषण होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. पण याबाबतीत कोणत्याही ठिकाणी तक्रार न केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मानसिक, शारीरिक, आर्थिक इत्यादी बाबतीत शोषण होत असल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -