घरमुंबईअप्पर वैतरणा धरणात फक्त ११ दिवसांत ७४ टक्के पाणीसाठा

अप्पर वैतरणा धरणात फक्त ११ दिवसांत ७४ टक्के पाणीसाठा

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात सध्या १२,५४,३७७ दशलक्ष लिटर (८६.६७ टक्के) इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पुढील ३२५ दिवस पुरेल इतका म्हणजे ८ जून २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे. विशेष म्हणजे या सात तलावांपैकी एक अप्पर वैतरणा हा तलाव गेल्या ८ जुलै रोजीपर्यन्त २९५ मिमी पाऊस पडूनही कोरडाच होता. मात्र ९ जुलै रोजी त्यात १०० मिमी पावसाची भर पडली आणि या धरणात २,४३३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला. त्यानंतर पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे फक्त ११ दिवसांत म्हणजे ९ जुलै ते १९ जुलै या कालावधीत अप्पर वैतरणा या धरणात १,६९,०४३ दशलक्ष लिटर (७४.४५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला.

सध्या सात धरणात जमा एकूण पाणीसाठ्यात अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठ्याची चांगलीच भर पडली आहे. दखल घेण्यासारखी एक बाब म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात खरे तर ९ जूनपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. मात्र संपूर्ण जून महिना उलटला. अगदी ८ जुलैपर्यन्त तरी इतर तलावाच्या तुलनेत अप्पर वैतरणा धरणात २९५ मिमीपर्यन्त पाऊस पडूनही दखल घेण्यासारखा पाणीसाठा जमा झालेला नव्हता. मात्र नंतर सलग ११ दिवस या धरणात चांगला पाऊस पडला. त्यामुळे या धरणात आजमितीस १,६९,०४३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.

- Advertisement -

अप्पर वैतरणा धरणात ९ जुलैपासून पडलेला पाऊस, दिवसागणिक पाणीसाठ्यातील वाढ  –
———————————————————-
तारीख                     पडलेला             जमा पाणीसाठा
एकूण पाऊस
मिमी मध्ये दशलक्ष लि.
———————————————————-

९ जुलैपर्यंत               ३९५                 २,४३३

- Advertisement -

१० जुलैपर्यंत              ५०३                 ३२,८८२

११ जुलैपर्यंत               ५९१                ५२,२५५

१२ जुलैपर्यंत               ७६३                ८६,९३०

१३ जुलैपर्यंत               ८१०                ९९,२६८

१४ जुलैपर्यंत              ९७०                 १,२२,५६९

१५ जुलैपर्यंत              १,०८२               १,४२,२५३

१६ जुलैपर्यंत               १,१६२              १,५१,६९९

१७ जुलैपर्यंत               १,२२०              १,५९,४९८

१८ जुलैपर्यंत               १,२५५              १,६४,२४९

१९ जुलैपर्यंत               १,२८४               १,६९,०४३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -