घरCORONA UPDATECoronavirus: आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus: आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

आर्थर रोड कारागृहातील एका करोनाबाधित कैद्यांशी संपर्कात आलेल्या ७७ कैद्यांसह सात कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने इतर कैद्यांसह कारागृहातील कैद्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सात कर्मचार्‍यांना ताडदेवच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कैद्यांना शुक्रवारी सेंट जॉर्ज आणि जी. टी. या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.  इतर कैद्यांना तसेच कर्मचार्‍यांना तिथेच क्वारंटाईन करण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील इतर कारागृहातील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचार्‍यासह कैद्यांची आता चाचणी केली जात आहे.

हत्येच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याला अलीकडेच जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचे नमूने घेतल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित अधिकार्‍यांना प्राप्त झाला होता. त्यात या कैद्याला कोरोना झाल्याचे उघडकीस आले. त्याच्यासोबत असलेल्या कारागृहातील इतर दोन कर्मचार्‍यांनाही नंतर कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कारागृहातील दिडशेहून अधिक कैद्यांसह कर्मचार्‍यांचे नमूने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल सायंकाळी संबंधित अधिकार्‍यांना प्राप्त झाले आहे. त्यात ७७ कैद्यासह सात कर्मचार्‍यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने तिथे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली होती. काहींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या कैद्यांसह इतर कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले. तर कोरोना झालेल्या सर्व कैद्यांना शुक्रवारी जी. टी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. तर इतर सात कर्मचार्‍यांना ताडदेव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यापूर्वी कारागृह प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण कारागृह लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुंबईसह ठाणे, कल्याण, पुणे येथील कारागृहाचा समावेश आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या काही कैद्यांची जामिनावर सुटका केली होती. तरीही कारागृहात करोनाचा शिरकाव झाल्याने कैद्यासह कारागृहातील कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याला पोलीस आयुक्तांची भेट

जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील २६ पोलिसांना करोना झाल्यानंतर संपूर्ण जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली असताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरुवारी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -