दहीहंडी फोडताना मुंबईत 111 गोविंदा जखमी, तर 23 जण रुग्णालयात

मुंबईत – मुंबईत कोरोनामुळे गेली दोन वर्षे सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नियम, अटी हटविल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र दहीहंडी फोडताना उंच थरावरून पडल्याने 111 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 88 गोविंदांना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर 23 गोविंदा काही प्रमाणात गंभीर जखमी झाल्याने अद्यापही विविध रुग्णलयात उपचार घेत आहेत.

दहीहंडीचा जोश असल्याने आणि निर्बंध उठविल्याने तरुणाई काहीशी जोशात होती. त्यातच दहीहंडी फोडताना अचनाकपणे पाय सटकल्याने, हात सुटल्याने थर कोसळल्याने हे गोविंदा जखमी झाले आहेत. अनेक गोविंदांना हात, पाय, मान, कंबर, तोंड, डोकं, छातीत कमी – अधिक प्रमाणात मार लागला व ते काही प्रमाणात जखमी झाले आहेत.

या रुग्णालयात गोविंदांवर उपचार –

सदर 78 जखमी गोविंदांमध्ये, जे.जे.रुग्णालयात – 2 , सेंट जॉर्ज रूग्णालयात – 3 तर जीटी रूग्णालयात – 11 अशा 16 जखमी गोविंदांची नोंद सरकारी रुग्णालयात करण्यात आली आहे. पालिकेच्या नायर रूग्णालयात – 9  केईएम – 17, सायन – 7, जोगेश्वरी ट्रॉमा केअर – 2, कूपर – 6, कांदिवली , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय – 1, व्ही. एन. देसाई – 6, राजावाडी – 10 तर पोद्दार रूग्णालयात 4 अशा एकूण 62 जखमी गोविंदांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, दहीहंडी निमित्ताने जखमी होणाऱ्या गोविंदाला पालिका, सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जखमी गोविंदांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इतके गोविंदा जखमी –

शहरात आतापर्यंत एकूण ७८ जखमींची नोंद झाली आहे. यापैकी ६७ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ११ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. याबाबत मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे.

 

गोविंदाचा मृत्यू झाल्यात 10 लाख रुपये –

दहीहंडीचा समावेश आता साहसी खेळात करण्यात आला आहे. तसेच प्रो कबड्डीच्या धर्तीवर आता प्रो दहीहंडी स्पर्दा भरवण्यात येणार आहे. तर आज दहीहंडी असून  कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान  दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.