Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईAir Pollution : वरळी, माटुंग्यातील 8 बांधकामे बंद; पालिका प्रशासनाची कारवाई, प्रदूषण...

Air Pollution : वरळी, माटुंग्यातील 8 बांधकामे बंद; पालिका प्रशासनाची कारवाई, प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले

Subscribe

मुंबई महापालिकेने इमारत बांधकामांच्या अंतर्गत निर्माण होत असलेल्या धुळीच्या प्रदूषणाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलली.

मुंबई : मुंबई महापालिकेने इमारत बांधकामांच्या अंतर्गत निर्माण होत असलेल्या धुळीच्या प्रदूषणाला रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलली. प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, माटुंगा, वडाळा आणि अँटॉप हिल येथील इमारत बांधकामांना पालिकेने नोटिसा बजावत ‘काम बंद ’ पाडण्याची कारवाई केली. त्यामुळे इमारत बांधकामे करताना प्रदूषण पसरवणार्‍या आणि नियमांचे उल्लंघन करून प्रदूषणाला हातभार लावणार्‍या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. (8 constructions closed in Worli, Matunga; the action of the municipal administration, caused violation of pollution rules)

मुंबईतील हवेतील प्रदूषणाबाबत मध्यंतरी न्यायालयाने आणि राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेला चांगलेच झापले होते. त्याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने इमारतींच्या बांधकामाअंतर्गत व तेथील कामगारांच्या वसाहतीमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी २७ प्रकारचे नियम जारी केले होते. त्यांची अंमलबजावणी करताना पालिकेने आणखीन दोन सुधारित नियम जारी केले होते, मात्र जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा असतो. त्यामुळे पालिकेने या कालावधीत कारवाईबाबत काहीशी ढील दिली होती, मात्र आता पावसाळा संपताच मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी कडक भूमिका घेत पुन्हा एकदा इमारत बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – New Govt : मंत्रालयातील मंत्र्यांची दालने सील; दालनाबाहेर मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या मात्र कायम

तसेच, इमारत बांधकाम उभारणार्‍या बिल्डरांनाही तंबी दिली होती, मात्र त्यानंतरही काही ठिकाणी इमारत बांधकामे करतांना पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत पालिकेने अखेर वरळी आणि माटुंगा येथे आठ इमारत बांधकामे करणार्‍या बिल्डरांना नोटिसा बजावत त्यांचे इमारत बांधकाम बंद ठेवण्याची कारवाई केली.

- Advertisement -

वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, वडाळा, अँटॉप हिल, माटुंगा परिसरात कारवाई

इमारत बांधकामे करताना प्रदूषण रोखण्यासाठी घालून दिलेल्या पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, वडाळा, अँटॉप हिल, माटुंगा परिसरात कारवाई करीत संबंधित बिल्डरांना ’ काम बंद ’ आदेश देणारी नोटीस बजावली. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी, प्रदूषणकारी प्रकल्पांवरील कारवाईला वेग देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आगामी काळात सदर कारवाई आणखीन वेगाने करण्यात येणार आहे.

हेही वाचा – New Government : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? यावेळी ठिकाण बदलण्याची शक्यता


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -