घरताज्या घडामोडीलालबाग गॅस दुर्घटनेत आतापर्यत ८ जणांचा मृत्यू

लालबाग गॅस दुर्घटनेत आतापर्यत ८ जणांचा मृत्यू

Subscribe

दुर्घटनेतील ३ जणांना बरे वाटल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित ५ जणांवर मसीना रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

लालबाग गॅस सिलेंडरच्या स्फोटात १६ जण जखमी झाले होते. त्यातील मृतांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लालबाग,साराभाई इमारतीत गॅस सिलिंडर दुर्घटनेतील गंभीर जखमी रोशन अंधारे (४०) याचा केईएम रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तर मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सूर्यकांत अंबिके (६०) यांचा मंगळवारी संध्याकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे. सुशीला बांगरे (६२), करीम (४५), मंगेश राणे (६१), ज्ञानदेव सावंत (८५), महेश मुणगे ( ५६), विनायक शिंदे ( ५७), रोशन अंधारे (४०) आणि सूर्यकांत अंबिके (६०) अशी आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

या दुर्घटनेतील ३ जणांना बरे वाटल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित ५ जणांवर मसीना रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. लालबाग, साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीच्या लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम असताना सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी ४ जणांवर मसीना रुग्णालयात तर उर्वरित १२ जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र १३ डिसेंबरपर्यंत केईएम रुग्णालयातील ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींपैकी ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. तर आणखीन तिघांवर केईएम रुग्णालयात तर चार जणांवर मसीना रुग्णालयात उपचार सुरू होते.

- Advertisement -

दरम्यान, केईएम रुग्णालयातील २ जणांना मसीना रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे मसीना रुग्णालयात एकूण ६ जणांवर उपचार सुरू होते. मात्र १५ डिसेंबर रोजी रात्री उशिराने केईएम रुग्णालयातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर मंगळवारी मसीनामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर गेला आहे.


हेही वाचा – जैविक कचऱ्याचे रुग्णालयातच निर्जंतुकीकरण, १४ कोटींचा खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -