घरमुंबईठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार

Subscribe

जिल्हा परिषद उपाध्यक्षासह 8 सदस्य आज शिवसेनेत

ठाणे जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय सत्तेचा पॅटर्न सर्वत्र चर्चीला जात असताना ठाणे झेडपीतील राष्ट्रवादी पक्षाच्या उपाध्यक्षांसह झेडपीतील विविध समित्यांचे आजी-माजी सभापती, राष्ट्रवादी व काँग्रेसचे झेडपी आणि पंचायत समिती सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या स्थापने पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र तरीही ठाणे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा भगवा फडकविण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले. राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून झेडपी ताब्यात घेतली. यासाठी शिवसेने राष्ट्रवादीला हाताशी धरत सत्ता काबीज केली. त्यात पक्षांतरामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झालेली असताना, काँग्रेसचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवधनुष्य हाती घेत, उपाध्यक्षपद मिळवून राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पक्षांतराचे वारे जोराने वाहू लागले आहेत. त्यात काही महिन्यांपूर्वी शहापुरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधले. असे असताना, ठाणे जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनीदेखिल शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाष भोईर, कृषी सभापती किशोर जाधव, समाज कल्याण सभापती संगिता गांगड, कृषी बाजार समिती सभापती इरफान भूरे यांच्यासह माजी समाजकल्याण सभापती निखिल बरोरा, काशिनाथ पष्टे, दपिाली झुगरे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदधिकारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -