घरताज्या घडामोडीमुंबईत केवळ ८ ते १० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण

मुंबईत केवळ ८ ते १० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महत्त्वाची कामे ठप्प असताना मान्सूनपूर्व कामांना वेग देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्यावतीने केला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही कामे योग्यप्रकारे सुरू आहेत की नाही तसेच कशाप्रकारे कामे केली जात आहे, याची पाहणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समिती सदस्यांसह केली. पावसाळ्यापूर्वी दिलेल्या निर्धारित वेळेत नालेसफाई आणि रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना यावेळी दिले. मात्र, मे महिना सुरू झाला तरी नालेसफाईचे काम हे ८ ते १० टक्केच पूर्ण झाल्याचे अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील नालेसफाई व रस्त्यांच्या कामांची स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि समिती सदस्य नगरसेविका अरुंधती दुधवडकर, नगरसेवक परमेश्वर कदम, विजेंद्र शिंदे यांच्यासमवेत केली.

- Advertisement -

मुंबई शहरातील वरळीच्या लव ग्रोव्ह पंपिंग नाल्यापासून पाहणीला प्रारंभ केला. त्यानंतर रेसकोर्स नाला, माहिम कॉजवे जवळील मिठी नदी, टी. विभागातील बाउंड्री नाला, भांडुप मधील उषा नगर नाला, भांडुप पूर्व मधील एपीआय नाला, एम/ पूर्व मधील मानखुर्द नाला, डब्बा कंपाउंड नाला, माहुल क्रीक आदी नाल्यांची पाहणी केली. त्यासोबतच डॉ.ॲनी बेझंट मार्गावरील जंक्शनची तसेच वरळीच्या आर.थडानी मार्गाच्या कामाची पाहणी केली. तसेच एस विभागातील वीर सावरकर मार्गाची आणि एम/ पूर्व विभागातील जीएमएलआर मार्गावरील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली.

सद्यस्थितीत आठ ते दहा टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून उर्वरित नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. सद्यस्थितीत रस्ते मोकळे असल्याने रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्यात येत असून २५ मे पर्यंत रस्त्यांची संपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा – LockDown: माहिममध्ये भाजीपाला, बेकरीसाहित्य घरपोच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -