घरमुंबईऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे ८ बळी

ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे ८ बळी

Subscribe

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे ८ बळी गेले असून यात डेंग्यूचे ३, लेप्टोचे ३ आणि मलेरियाचे २ अशी संख्या आहे.

मुंबईत सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यानुसार साथीच्या आजारांचे प्रमाण ही घटले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे बळी गेले आहेत. ज्यात डेंग्यूचे ३ , लेप्टोचे ३ आणि मलेरियाचे २ असे एकूण ८ बळी गेले आहेत. तर, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात ८०४ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. यावर्षी मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाली असल्याचे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ

१६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गॅस्ट्रोचे २६९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ ते १५ या कालावधीत ३७६ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले होते. म्हणजे ऑगस्ट महिन्यात एकूण ६४५ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेत. तर लेप्टोचे ४६ रुग्ण आढळले असून डेंग्यूचे १४३ रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

लेप्टोचे एकूण १२ बळी

लेप्टोचे आतापर्यंत एकूण १२ बळी गेले आहेत. प्राचील काळे, तन्मय कमलेश प्राज्ञे (१६), सिद्धेश माणगावकर (२७), इम्तियाझ मोहम्मद अली (२८) या चार जणांचा लेप्टोने बळी गेला आहे. तर २८ जुलैला कांदिवली येथील २५ वर्षीय तरुणाचा तर ४ ऑगस्ट महिन्यामध्ये चेंबूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा लेप्टोने मृत्यू ओढावला आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पंधरावड्यात लेप्टोचे दोन बळी गेले असून यात ७ वर्षाच्या मुलाचा आणि ३५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. शिवाय, जुलै महिन्यात कुर्ला येथील ३२ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मात्र हे रुग्ण येथील नसून ते उत्तर प्रदेशमधून आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

डेंग्यूच्या आजारासाठी ११६९ घरांचे केले सर्वेक्षण

मुंबईत डेंग्यूच्या संशयित ११३४ रुग्णांवर सध्या पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून आजार रोखण्यासाठी पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन आजारा संदर्भातील माहिती देत आहेत. आतापर्यंत डेंग्यूसाठी ११६९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात ७ तापाचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू केले आहेत. या सर्वेक्षणात चार घरांमध्ये माशांचे उत्पत्तीस्थानं आढळून आले असून ते नष्ट देखील करण्यात आले आहे. तसेच, लेप्टोच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पालिका कर्मचाऱ्यांनी ११२० घरांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये लेप्टोच्या संशयित तापाचे तीन रुग्ण सापडले असून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.  – डॉ. पद्मजा केसकर, पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -