घरCORONA UPDATECoronvirus: सावधान! मुंबईत आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Coronvirus: सावधान! मुंबईत आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू शनिवारी झाला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच मुंबईमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू शनिवारी झाला होता. कोरोनाची लक्षणे असल्याने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. मात्र उपचार सुरु असतानाचा त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट समोर आले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

रुग्णाची प्रवास हिस्ट्रीच नव्हती, मग…

या व्यक्तीने कुठेही परदेशात प्रवास केला नव्हता. त्यामुळे त्यांना लागण झाली कशी याची माहिती मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान या व्यक्तीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या रुग्णाच्या मृत्युनंतर आता राज्यातील मृतांची संख्या दहावर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -