मुंबईत ८४ हजार किलो प्लास्टिक जप्त; दंडापोटी आकारले ४ कोटी ५४ लाख

मुंबईत आतापर्यंत तब्बल ८४ हजार २१० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून या कारवाईपोटी आतापर्यंत ४ कोटी ५४ लाख इतका दंड वसूल करण्यात आल्याचे माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

84 Thousands of plastic seized in Mumbai
मुंबईत ८४ हजार किलो प्लास्टिक जप्त

राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयामुळे मुंबई शहरात आतापर्यंत तब्बल ८४ हजार २१० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तर या कारवाईपोटी आतापर्यंत ४ कोटी ५४ लाख इतका दंड वसूल करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले असून २३ फेब्रुवारी २०१८ ते १ जानेवारी २०२० पर्यंतची ही आकडेवारी असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. तर मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या भागात प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री सुरु असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

दंडापोटी आकारले ४ कोटी ५४ लाख

राज्यात प्लास्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत भाजप आमदार पराग अळवणी, कॅप्टन आर सेल्वन, आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरील माहिती दिली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्मकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हातळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने मुंबईतील ५३ प्लास्टिक उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याकडे अनेक आमदारांनी लक्ष वेधले आहे. यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर व्हिडिओ कान्फरसिंगद्वारा मुंबई येथे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तर यासाठी लवकरात लवकर या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महानगरपालिकांना कृती आराखडा तयार करुन सरकारकडे सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी लेखी उत्तरात नमूद केले आहे.


हेही वाचा – बुरखा परिधान करुन ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; चोराने बुरखा काढला आणि…