घरताज्या घडामोडी२४ तासांत मुंबईत ८४६ कोरोनाचे नवे रुग्ण, ४२ जणांचा मृत्यू!

२४ तासांत मुंबईत ८४६ कोरोनाचे नवे रुग्ण, ४२ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत मागील २४ तासांत ८४६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत मागील २४ तासांत ८४६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६८ हजार ४८१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार ८४२ झाली आहे. तसेच आज ४५७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३४ हजार ५७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी ८४६ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दीर्घकाळ आजार असलेल्यांचा समावेश असून यामध्ये ६४ पुरुष तर ४३ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ७ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. तर ६० जणांचे वय ६० वर्षांवरील आहे. तर ४० रुग्ण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासांत २४८ जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे २४८ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार २१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ६९ हजार ६३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ % एवढे झाले आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात मागील २४ तासांत २४८ जणांचा मृत्यू तर ३ हजार २१४ नवे रुग्ण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -