घरताज्या घडामोडीधक्कादायक! रेल्वेत चोरी करणारे ८५ टक्के चोर मोकाट

धक्कादायक! रेल्वेत चोरी करणारे ८५ टक्के चोर मोकाट

Subscribe

रेल्वेत चोरी करणारे ८५ टक्के चोर मोकाट असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेत दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांना गर्दीमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्याशिवाय या प्रचंड गर्दीत आपली बॅग, मोबाईल, पाकिट कुणी चोरत तर नाही ना? याची देखील आपल्यालाच घ्यावी लागते. कारण एकदा चोरी झालेली वस्तू परत मिळेल याची काही गँरेंटी नाही. मुंबईकरांच्या या भितीला दुजोरा देणारी माहिती राज्य सरकारच्यावतीने आज विधानपरिषदेत दिली. २०१९ या एका वर्षात मुंबई रेल्वे पोलीस हद्दीत चोरीचे ३१ हजार ५८६ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी फक्त ३ हजार ३७४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याचाच अर्थ उरलेल्या २८ हजार २१२ प्रकरणांमध्ये अद्याप चोरीचा छडा लावण्यात आलेला नाही.

उत्तरात धक्कादायक खुलासा

शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय विधानपरिषदेत उपस्थित केला होता. याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मुंबई रेल्वेत घडणाऱ्या चोरीच्या घटनांची उकल करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात असल्याचेही गृहखात्या मार्फत या लेखी उत्तरात म्हटले आहे.

- Advertisement -

चोरांच्या सावटाखाली मुंबईकरांचा प्रवास

मुंबईकरांचा प्रवास हा चोरांच्या सावटाखाली होत असून ८५ टक्के घटनांमध्ये आरोपी मोकाट असल्याचा प्रश्न पोतनीस यांनी लेखी प्रश्नात विचारला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, ‘मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात दाखल झालेल्या गुनह्यांचा आढावा घेण्यासाठी आठवड्च्याच्या प्रत्येक मंगळवारी आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीत गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, गुन्ह्यांचा सर्वतोपरी तपास वेळेत पुर्ण करण्याच्या सूचना देण्यात येतात’.

तसेच क्रिस्प (Criminal Intensive Surveillance Project) ही योजना राबवून रेकॉर्डवरील आरोपींना नियमितपणे तपासले जात आहे. तसेच रेल्वे स्थानकावर २८८ सीसीटीव्ही आणि ४१६२ कॅमेरे बसवले असून त्याद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! संगणक शिक्षकाकडून १४ विद्यार्थींनीचा विनयभंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -