Corona Update: मुंबईत २४ तासांत आढळले ८६२ नवे रुग्ण, ४५ जणांचा बळी!

Mumbai Corona Update: 608 corona cases recorded in last 24 hours in mumbai
Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६०८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत मागील २४ तासांत ८६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडा १ लाख २१ हजार २७वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ६ हजार ६९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत २४ तासांत १ हजार २३६ रुग्ण बरे होऊन घरे गेले असून आतापर्यंत ९३ हजार ८९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २० हजार १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ३१ रुग्ण पुरुष आणि १४ रुग्ण महिला होत्या. यामधील २९ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १ जणाचे वय ४० वर्षा खाली होते. ३३ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ११ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईतील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के एवढे आहे. ६ ऑगस्टपर्यंत ५ लाख ८३ हजार १६० कोविड चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर ८५ दिवस आहे. आज धारावीत ७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ६०४वर पोहोचला आहे. तसेच दादरमध्ये २१ तर माहिममध्ये १० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९६३ तर माहिममधील १ हजार ८१९वर पोहोचला आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यातील कोरोना बळींची संख्या १७ हजार पार!