Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मुंबईच्या विमानतळावरुन ९ कोटीचे हेरॉईन जप्त; आफ्रिकन महिलेला अटक

मुंबईच्या विमानतळावरुन ९ कोटीचे हेरॉईन जप्त; आफ्रिकन महिलेला अटक

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तब्बल ३ किलोचे हेरॉईन जप्त करण्यात आले असून याप्रकरणी परदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एनसीबीकडून धडक कारवाई केली जात आहे. त्यातच आज पुन्हा एकदा एनसीबीने मुंबईच्या विमानतळावर कारवाई केली. या कारवाईत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ३ किलोपेक्षा अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहेत. या हेरॉईनची किंमत तब्बल ९ कोटी इतकी असून या हेरॉईनसह एका आफ्रिकन महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हे हेरॉईन कोणाला देण्यात येणार होते, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून याप्रकरणी एनसीबीकडून सध्या चौकशी सुरु आहे.

अशी करण्यात आली कारवाई

- Advertisement -

एनसीबीच्या पथकाला माहिती मिळाली होती की, मोठ्या प्रमाणात हेरॉईन भारतात आणले जाणार आहेत. तसेच हे हेरॉईन परदेशी महिला घेऊन येणार असून ती आफ्रिकन महिला असणार असल्याची माहिती देखील मिळाली होती. मात्र, हे हेरॉईन किती कोटींचे आणि किती वजनाचे असणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने मुंबईच्या विमानतळावर सापळा रचला होता. त्यानंतर एका आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून तब्बल ९ कोटी रुपयांची ३ किलोची हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. ही हेरॉईन कुठे घेऊन जाणार होते. याबाबत कोणतीही अद्याप माहिती मिळाली नसून याप्रकरणी एनसीबी शोध घेत आहेत.

अभिनेत्री दिया मिर्झाच्या मॅनेजरला एनसीबीकडून अटक

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे अटकसत्र सुरु असताना सिनेअभिनेत्री दिया मिर्झाची महिला मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिचा मित्र करण सजनानी यांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांची होतेय ‘लोकल’ भूल


 

- Advertisement -