मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या

mumbai police
महाराष्ट्र पोलीस

काही दिवसांपूर्वी १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्यामुळे गोंधळ उडाला होता. या बदल्यांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा गृह विभागाकडून पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

deputy commissioner of police transfer order

पोलीस उपायुक्त परमजितसिंह दहिया यांची बदली परिमंडळ ७ येथून परिमंडळ ३ येथे करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना नियुक्त करण्यात आले आहे. रश्मी करंदीकर यांच्याकडे सायबर सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सायबर सेलचे माजी प्रमुख विशाल ठाकूर यांची परिमंडळ ११ येथे बदली करण्यात आली आहे. तर गणेश शिंदे, शहाजी उमप, डॉ. मोहन दहीकर, प्रणय अशोक यांची देखील त्यांच्या विभागातून नवीन विभागात बदली करण्यात आली आहे.

वरील सर्व अधिकाऱ्यांना नव्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.