मुंबईत ९ वर्षाच्या विद्यार्थ्यावर रिक्षावाल्याचा अत्याचार

भांडूपमध्ये ९ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाले आहेत. रिक्षावाल्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

sexully harresment image
प्रातिनिधीक फोटो

मुंबईत आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपली मुलं सुरक्षित आहेत का? ओळखीच्या माणसाकडून काही वावगं तर घडत नाही ना? याकडे आता लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण मुंबईतील भांडूपमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, ९ वर्षाच्या मुलावर ५० वर्षाच्या रिक्षावाल्यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्य बाब म्हणजे संबंधित रिक्षावाला हा विद्यार्थ्याच्या आणि त्यांच्या घरातील लोकांच्या परिचयाचा असून मागील ६ वर्षापासून तो पीडित मुलाला शाळेत सोडण्याचा काम करतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही घटना घडली असून रविवारी रिक्षावाल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ नोव्हेंबर रोजी रिक्षावाल्यानं पीडित मुलाला दिवाळीचा फराळ देण्याच्या निमित्तानं घरी बोलावलं. ओळखीचा असल्यानं मुलाच्या घरच्यांना देखील त्यामध्ये काहीही वावगं वाटलं नाही. त्यांनी देखील मुलाला रिक्षावाल्याच्या घरी जाऊ दिलं. मुलाच्या बहिणीनं पीडितेला रिक्षावाल्याच्या घरी सोडलं. पण, तासाभरानंतर देखील मुलगा परत न आल्यानं घरच्यांना काळजी वाटली. त्यामुळे आईनं मुलाला रिक्षावाल्याच्या घरी घेण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पण, रस्त्यामध्ये मुलगा रडत येताना आईला दिसला. त्यामुळे आईच्या चिंतेमध्ये वाढ झाली. आईनं ज्यावेळी मुलाला विचारणा केली, तेव्हा सारी गोष्ट मुलानं आईच्या कानावर घातली. रिक्षावाल्यानं फराळ दिल्यानंतर अत्याचार केल्याची गोष्ट काळाल्यानंतर आईच्या पायाखालची वाळूच सरकली. यावेळी रिक्षावाल्यानं झाल्याप्रकाराबद्दल कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दिल्याचं मुलानं सांगितलं. त्यानंतर पीडित मुलाच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत रिक्षावाल्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रिक्षावाल्याला अटक करण्यात आली आहे. या साऱ्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.