घरCORONA UPDATECorona Update : मुंबईत २४ तासांत आढळले ९२१ कोरोनाबाधित रुग्ण

Corona Update : मुंबईत २४ तासांत आढळले ९२१ कोरोनाबाधित रुग्ण

Subscribe

१०१७इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढतच आहे. मुंबईत रविवारी ९२१ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख १९ हजार १२८ वर पोहचला आहे. रविवारी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ४४२ वर पोहचला आहे. ५४०रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या दोन लाख ९९ हजार ५४६ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ७२७६सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३४६दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या ६८चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

तर १०१७ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३१लाख ३३हजार ४२९चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याचे आज मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासामध्ये ६९७१ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर २४१७ कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनाशी झुंज यशस्वी पार पाडून घरी परतले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २१,००,८८४ वर पोहोचला आहे. तर एकूण ५१७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्या आतापर्यंत १९,९४,९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात एकूण ५२,९५६ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशीही माहिती आरोग्या विभागाने दिली आहे.


हेही वाचा : नियम पाळा लॉकडाऊन टाळा, मुख्यमंत्र्यांनी दिले ८ दिवसांचे अल्टिमेटम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -