घरमुंबईमुंबईतील ९४,८५१ अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी; मात्र ५४६१ बांधकामावरच कारवाई

मुंबईतील ९४,८५१ अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी; मात्र ५४६१ बांधकामावरच कारवाई

Subscribe

अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणाली १ मार्च २०१६ पासून ८ जुलै २०१९ पर्यंत एकूण ९४ हजार ८५१ तक्रारीऐवजी फक्त ५४६१ अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली आहे.

मुंबईत बेकायदेशीर इमारती ही मोठी समस्या आहे. दरवर्षी हजारो बेकायदेशीर इमारती बांधून महापालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांची संगनमताने बांधकाम केले जाते. बेकायदेशीर बांधकाम टाळण्यासाठी किंवा निष्कासित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु बेकायदेशीर बांधकाम हे जसेच्या तसे आहे. जेणेकरून कमला मिल कम्पाउंड, भानु फरसान मार्ट, होटल सिटी किनारा, हुसैनी बिल्डिंग (भिन्डी बाजार), साई सिद्धी बिल्डिंग (घाटकोपर), केसरबाग बिल्डिंग (डोंगरी), अपघातामुळे शेकडो मुंबईकरांचा जीव गेला आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणाली १ मार्च २०१६ पासून ८ जुलै २०१९ पर्यंत एकूण ९४ हजार ८५१ तक्रारीऐवजी फक्त ५४६१ अनधिकृत बांधकामावर कारवाई झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक अभियंता (अति.नि.) शहरे यांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी अतिक्रमण व निर्मुलन शहरे कार्यालयकडे ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर अनधिकृत बांधकामबाबत किती तक्रार नोंद झाली आहे. तसेच किती अनधिकृत बांधकामला नोटीस देण्यात आलेली आहे. व किती अनधिकृत बांधकामला निष्कासित करण्यात आले आहे याबाबत माहिती विचारली होती. ही माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक अभियंता (अति.नि.) शहरे यांनी माहिती दिली आहे. माहितीप्रमाणे १ मार्च २०१६ पासून ८ जुलै २०१९ पर्यंत ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर सर्वात जास्त एकूण ९१९२ तक्रार एल विभागात नोंद झाली आहे. मात्र एल विभागानी फक्त ३२३ अनधिकृत बांधकामावर कार्यवाही केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कर्नाटकातील ‘त्या’ बंडखोर आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा – सुप्रीम कोर्ट

सेनेच्या विराट मोर्चाला सुरुवात; उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांची उपस्थिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -