घरमुंबई९५ वर्षीय आजींची संगीत 'भक्ती' !

९५ वर्षीय आजींची संगीत ‘भक्ती’ !

Subscribe

९५ वर्षीय पार्वती सेशानंदन यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली ८ गाणी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली.

‘संगीता’ला ना कोणती जात असते ना कोणता धर्म. जो संगीताची मनोभावे उपासना करतो आणि ज्याचं मन पवित्र आहे असा कुणीही उत्तम संगीताची निर्मिती करु शकतो. संगीताला ना भाषेचं बंधन असतं ना वयाचं. नुकतीच मुंबईमध्ये याची प्रचिती आली ती ९५ वर्षीय पार्वती सेशानंदन यांच्या रुपाने. मुळच्या केरळच्या असलेल्या मात्र सध्या माटुंगामध्ये राहत असलेल्या पार्वती आजींनी त्यांचं स्वत:च भक्तीसंगीत रिलीज केलं आहे. पार्वती आजींनी आजवर अनेक भक्ती रस असलेली गाणी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांपैकी ८ गाणी नुकतीच माटुंगाच्या मैसुर असोसिएशन हॉलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आली.

पार्वती यांचा मुलगा एस. सिवासुब्रमण्यम यांनी सांगितल्यानुसार,”ही सर्व गाणी पार्वती यांनी ३० वर्षांपूर्वीच लिहिली होती. आज त्यातील काही गाणी संगीतबद्ध करुन तुमच्या समोर रिलीज करताना आम्हाला खूप आनंद होत आहे”. विशेष म्हणजे ही सर्व गाणी स्वत: पार्वती यांनीच लिहीली आहेत. सिद्धीविनायकचा गणपती, मुरुगा, अयप्पा स्वामी, कांची महास्वामी आदी देवांवर ही गाणी लिहिण्यात आली आहेत. याशिवाय त्यांचे एक गाणे भगवद् गीतेवर आधारित आहे. पार्वती आजी अय्यप्पा स्वामींच्या भक्त असून गेल्या ३५ वर्षांपासून त्या नियमित अयप्पा स्वामींची तीर्थयात्रा करत आहेत.

- Advertisement -
पार्वती सेशानंदन
कार्यक्रमादरम्यान पार्वती यांचा सत्कार करताना

 

मे १९२३ ला केरळच्या थिरुप्पनीथुरा या गावात आजींचा जन्म झाला होता. लग्नानंतर १९४० साली त्या मुंबईला स्थलांतरित झाल्या. आजवर आजींनी एकूण ३० भक्तीमय गाणी संगीतबद्ध केली असून त्यापैकी ८ गाणी ही बहारीनमध्ये रेकॉर्ड करण्यात आली. त्यांची मुलगी कल्याणी त्रिपुरासुंदरी ही बहारीनमध्ये स्थायिक आहे. तिने आयोजित केलेल्या एका स्थानिक कार्यक्रमात आजींची ती ८ गाणी प्रदर्शित करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -