Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई 'MCGM 24x7' अॅपद्वारे रस्तेविषयक ९६४ तक्रारींचा निपटारा

‘MCGM 24×7’ अॅपद्वारे रस्तेविषयक ९६४ तक्रारींचा निपटारा

'MCGM 24x7' या महापालिकेच्या अॅन्ड्रॉइड अॅप मध्ये नागरिकांना त्यांच्या विविध तक्रारी सहजपणे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या १ हजार ७० तक्रारीपैकी ९६४ तक्रारी या रस्तेविषय असल्याचे समोर आले आहे.

Related Story

- Advertisement -

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधाविषयक कामे अधिक चांगल्या गुणवत्तेची व्हावीत, यासाठी महापालिका दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही तास अव्याहतपणे कार्यरत असते. या अनुषंगाने नागरिकांना तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअॅप संदेश, संकेतस्थळ, दूरध्वनी यासारखे विविध पर्याय उपलब्ध असून आता ‘MCGM 24×7’ या महापालिकेच्या अॅन्ड्रॉइड अॅप मध्ये नागरिकांना त्यांच्या विविध तक्रारी सहजपणे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. याच अॅपमध्ये रस्ते विषयक तक्रारींसाठी स्वतंत्र मॉड्यूल कार्यरत आहे. या रस्ते विषयक मॉड्यूलमध्ये १० जून ते ९ जुलै २०१९ या एका महिन्याच्या कालावधी दरम्यान १ हजार ७० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच ९६४ तक्रारींचा निपटारा रस्ते खात्याद्वारे करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या रस्ते खात्याचे प्रमुख अभियंता नाडगौडा यांनी दिली आहे.

रस्ते विषयक तक्रारी याठिकाणी करा दाखल

बृहन्मुंबई महापालिकेशी संबंधित विविध नागरी सेवा सुविधा विषयक तक्रारी आणि सूचना नागरिकांना अधिक सुलभपणे नोंदविता याव्यात, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे www.mcgm.gov.in हे संकेतस्थळ, १९१६ हा दूरध्वनी क्रमांक यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील रस्तेविषयक दायित्व असणाऱ्या संबंधित अभियंत्यांचे व्हॉट्सअप क्रमांक यापूर्वीच सार्वजनिक करण्यात आले आहेत. ज्यामुळे रस्ते विषयक तक्रारी व्हॉट्सऍप संदेशाद्वारे नोंदविणे सहज शक्य आहे.

९०.०९ टक्के तक्रारींचे निराकरण

- Advertisement -

वरील तपशीलांनुसार रस्ते विषयक तक्रारी आणि सूचना नोंदविण्यासाठी महापालिकेने नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायांमध्ये आणखी एक महत्त्वाचा पर्याय आहे. तो म्हणजे बृहन्मुंबई महापालिकेने तयार केलेले ‘MCGM 24×7’ हे अॅन्ड्रॉईड आधारित अॅप! या अॅपमध्ये रस्तेविषयक तक्रारी आणि सूचना नोंदविण्यासाठी स्वतंत्र मॉड्यूल देण्यात आले आहे. ज्याद्वारे नागरिकांना त्यांच्या रस्तेविषयक तक्रारी किंवा सूचना अॅन्ड्रॉईड आधारित भ्रमणध्वनीद्वारे नोंदविणे सहज शक्य आहे.

अॅपविषयी थोडक्यात

‘MCGM 24×7’ हे अॅन्ड्रॉईड ऍपगूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून ते आजवर एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना डाऊनलोडकेले आहे. या अॅपमध्ये इतर विविध मॉड्यूलसह रस्तेविषयक तक्रारी आणि सूचना नोंदविण्यासाठी स्वतंत्र मॉड्यूलपूर्वीपासूनच कार्यरत आहे. तथापि, महापालिकेचे अॅप हे आवश्यकतेनुसार नियमितपणे अद्ययावत करण्यात येत असल्याने ज्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये हे अॅप पूर्वीपासून आहे. त्यांनी सदर अॅप अद्ययावत (Update) करणे आवश्यक आहे किंवा आधीचे अॅपअनइन्स्टॉल करुन नव्याने अॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.


- Advertisement -

हेही वाचा – महापालिका महासभेतील जेवण बंद

हेही वाचा –  विकासकामांच्या मंजुरीची प्रक्रिया दोन महिन्यात; महापालिका आयुक्तांचे फर्मान


 

- Advertisement -