घरताज्या घडामोडीमुंबईत आज कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण, तर १,०११ जणांना डिस्चार्ज

मुंबईत आज कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण, तर १,०११ जणांना डिस्चार्ज

Subscribe

आज मुंबईत ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईमध्ये कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ८६३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५४०२ वर पोहचला आहे.

आज दिवसभरात मुंबईमध्ये तब्बल १ हजार ११ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ६६ हजार ६३३ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये आज ९६९ नवे रुग्ण सापडले असून ७० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४९ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४४ जण हे ६० वर्षांवरील, तर २४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ४७ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

मुंबईत कोरोनाचे ९३२ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६६ हजार ४८२ वर पोहचली आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


Corona Update: राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद; २३१ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -