CoronaVirus: ठाणे पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी

dead body
मृतदेह

ठाणे पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी गेला असून श्रीनगर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या ४५ वर्षीय महिला पोलीस शिपाईचा गुरुवारी कोरोना या आजाराने निधन झाले आहे. या महिला पोलीसाच्या निधनामुळे ठाणे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यासह मुंबई पोलीस दलातील करोनाने मृत्यू झाल्याची संख्या १६ झाली आहे. ठाणे पोलीस दलात असलेल्या या महिला पोलीस शिपाई श्रीनगर पोलीस ठाण्यात तैनात होत्या. ठाण्यातील शांती नगर येथे आपल्या दोन मुलींसह राहणाऱ्या पोलीस शिपाई यांचे पती राज्य राखीव दलात पोलीस शिपाई होते. मात्र गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते. पतीच्या जागी २००८ मध्ये ठाणे पोलीस दलात पोलिस शिपाई म्हणून त्यांना नोकरी मिळाली होती.

श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पोलीस शिपाई या डायलिसिसवर होत्या. २३ एप्रिल रोजी त्यांना डायलिसिस करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आलेली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचे निधन झाले, असे शिंदे यांनी सांगितले. ठाणे पोलीस दलात कोरोनाने पहिला मृत्यू झाला असून महिला पोलीस शिपायाच्या मृत्यूमुळे ठाणे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा –

नदीचा बनतोय नाला, पात्रात बिनधास्त बांधकामं; जबाबदारी नक्की कोणाची?