आदित्य ठाकरेंच्या वरळीतच शिवसेनेला मोठा धक्का; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना नेते आदित्य ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडुकीच्या रिंगणात उतरून वरळीचे आमदार बनले परंतु आता आदित्य ठाकरेंच्या याच वरळी मतदार संघातील शिवसैनिक आणि युवा सैनिकांचा शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

aditya thackeray and eknath shinde

आदित्य ठाकरे (aditya thackeray)आमदार असलेल्या मुंबईतील वरळी (worli) विधानसभा मतदार संघातील शेकडो शिवसैनिकांनी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याच मतदार संघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी त्यांच्या उपस्थितीत वरळी मधील शिवसैनिकांनी एकनाथच शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) सुद्धा काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा – ‘भारत जोडो’ यात्रेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाचे संतुलन बिघडले, नाना पटोलेंची टीका

शिवसेना नेते आदित्य ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडुकीच्या रिंगणात उतरून वरळीचे आमदार (worli MLA aditya thackeray) बनले परंतु आता आदित्य ठाकरेंच्या याच वरळी मतदार संघातील शिवसैनिक आणि युवा सैनिकांचा शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. ”हे सरकार तुमचं आहे, त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्याचे काम सरकार नक्की करणार आहे. मी तुमचे प्रश्न नक्की सोडविणार. असं आश्वासन सुद्धा एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसैनिकांना आणि युवा सैनिकांना दिले”. दरम्यान ”या पूर्वीही वरळी मतदार संघातून काही कार्यकर्ते आले होते. आजच आले. मुंबईतही विविध ठिकांणांहून कार्यकर्ते येते आहेत. जे आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन आपण पुढे जाऊया. त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू आणि सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे”. असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका, आत्मघातकी स्फोट घडवण्याची धमकी

दरम्यान शिवसैनिकांप्रमाणेच विक्रोळी (cnp vikroli)मधील राष्ट्रवादीच्या ईशान्य मुंबई जिल्हा संघटक सिंड्रेला प्रभू गवळी यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. विक्रोमध्ये असलेले महात्मा फुले या महापालिकेच्या रुग्णालय मागील अनेक वर्षे रखडले आहे. अनेक आश्वासने देऊनही सुग्णालयाचे पुनर्निर्माण होते नव्हते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या रुग्णालयाची पाहणी केली. हे रुग्णालय विक्रोमधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळेच आम्ही शिंदे गटात प्रवेश केला असं गवळी म्हणाल्या.

हे ही वाचा – महाराष्ट्रात हॅलोऐवजी आता वंदे मातरम, राज्य सरकारचा जीआर