घरमुंबईउत्तनजवळ समुद्रात बोट बुडाली

उत्तनजवळ समुद्रात बोट बुडाली

Subscribe

सर्व 11 खालाशांना वाचवले

ठाणे जिल्ह्यातील उत्तन गावातील एक बोट शनिवारी सकाळी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेली होती. रविवारी रात्री अचानकपणे समुद्रात वादळ व जोराचा वारा आल्याने अचानकपणे उलटली आणि खलाशी पाण्यात बुडाले होते. त्यातील एका खलाशाने तब्बल दीड किलोमीटर अंतर पोहून जाऊन दुसर्‍या बोटीची मदत घेतली होती. त्यानंतर उत्तन गावातील आठ बोटींनी खोल समुद्रात जाऊन बुडालेला सर्व खलाशांना मंगळवारी रात्री सुखरूपणे घरी आणले.

पालघर सातपटी येथील अनिल काशिनाथ तांडेल यांची साई लक्ष्मी नावाची बोट शनिवारी सकाळी 10 वाजता उत्तन येथून निघाली होती. रविवार 16 डिसेंबर 2019 रोजी रात्री एकच्या सुमारास समुद्रात अचानक वादळ झाल्याने वार्‍यामुळे बोट उलटली होती. बोट समुद्रकिनार्‍यापासून 35 नोर्टीकल (म्हणजेच 70 किलोमीटर) दूरवर बुडाली होती. त्यावर असलेले 11 खलाशी बुडाले होते.

- Advertisement -

बोट बुडाल्यानंतर त्यातील एका मच्छिमाराने दीड किलोमीटर अंतर बोटीवरील ड्रमच्या साहाय्याने पोहून समुद्रात असलेल्या दयासागर नावाच्या बोटीजवळ जाऊन मदत मागितली. तेव्हा त्यांनी त्या मच्छीमाराला आपल्या बोटीत घेऊन वायरलेसवर कॉल करून अपघाताची खबर दिली होती. ही माहिती मिळताच उत्तन गावातील शास्त्रलेख, सिलोम, मॉर्निंग स्टार, अनोक, एंजल, वर्चस्वी, यशस्वी, आदाम, कॅरेबियन, समुद्रिका या बोटी समुद्रात गेल्या होत्या. या बोटींनी समुद्रात जाऊन अकराही खलाशांना सुखरुपपणे बाहेर काढले.

या घटनेविषयी कळताच वांशिता विजय बगाजी यांनी उत्तन पोलीस ठाणे येथे माहिती नोंदवली. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. स्थानिक लोकांनी आपल्या खालगी बोटी पाठवून त्या बोटीला व सर्व मच्छिमार खलाशांना मंगळवारी रात्री 9 वाजता उत्तन येथील बंदरावर आणले. मत्स्य व्यवसाय विभागाचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य पाटील यांनी उत्तन बंदरावर जाऊन बोटीचा पंचनामा केला आहे. या दुर्घनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, बोट अपघातग्रस्त झाल्याने बोटीचे सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -